Onion Export Ban : इथेनॉलनंतर कांदा निर्यात बंदी; सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर काँग्रेसचा हल्लाबोल

Congress Leader Protest Against Onion Export Ban : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे...
Rajendra Nagawade
Rajendra NagawadeSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics News : नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून 'हल्लाबोल' केला. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील असून, याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करणार असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. या हल्लाबोल आंदोलनात काँग्रेससह शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नागवडे यांनी केले.

कांदा निर्यात बंदी करणे, दूध हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष आणि इथेनॉल उत्पादनावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील आहे. सरकार आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी वेगवेगळे मुद्दे पुढे करत आहे. याविरोधात मंगळवारी (ता. १२) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Rajendra Nagawade
BJP Politics: भाजपच्या कांदा निर्यातबंदीने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष!

केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संतापाची लाट आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार उदासीन असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाच्या प्रमाणात हमीभाव मिळणे आवश्यक असताना सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कांद्याला दोन पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना वाटत असतानाच त्यावर निर्यात बंदी घातली, असे नागवडे यांनी म्हटले. मागील अतिवृष्टीचे थकीत अनुदान नुकसानग्रस्तांना त्वरित मिळावे. ऑनलाइन पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी नागवडे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"इथेनॉलवरील बंदी उठवावी"

तसेच गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान अजून प्रलंबित आहे. विमा पॉलिसीचे अग्रिम हप्ते सर्वांना मिळालेले नाहीत. मागील अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून साखर कारखान्यांनी इथेनॉल प्लांट उभे केले. आता त्याचे उत्पादन घेऊन कर्जफेड करणे गरजेचे असताना सरकारने त्यावर बंदी घातली. या तुघलकी निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन ते अडचणीत येऊ लागल्याचे राजेंद्र नागवडे यांनी म्हटले.

Edited by sachin fulpagare

Rajendra Nagawade
Maharashtra Politics : जिवावर उदार शेतकऱ्यांनी चक्क समृद्धी महामार्गच रोखला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com