Onion farmers Politics: लोकसभा प्रमाणेच निवडणुकीत कांदा कारभाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार?, नगरपालिकेच्या तोंडावर शेतकरी झाले आक्रमक

Onion prices fall ahead of municipal elections BJP in trouble again-सत्ताधारी, विरोधकांचे नेते नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात, तर दर कोसळल्याने संतापलेला शेतकरी रस्त्यावर!
Onion Farmers Agitation, Chandwad
Onion Farmers Agitation, ChandwadSarkarnama
Published on
Updated on

Farmers Agitation News: कांदा उत्पादकांची आर्थिक समस्या दूर होण्याची चिन्हे नाहीत. आज पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले, त्यांनी थेट आक्रमक होत दोन तास आंदोलन केले.

आज सकाळी नऊला चांदवड बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू होताच व्यापाऱ्यांनी सरासरीपेक्षा कमी भाव पुकारला. त्यामुळे शतकऱ्यांत संताप होता. कांद्याचे भाव थेट २८० रुपयापर्यंत घसरले. उन्हाळ कांदा ५०० रुपये प्रती क्विंटल होता. हा दर वाहतूक खर्चालाही परवडणारा नसल्याने शेतकरी संतापले.

यावेळी संताप शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीतील लिलाव बंद पाडले. व्यापाऱ्यांशी वाद घातला. जाणीवपूर्वक कांदा भाव पाडल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्यातूनच शेतकरी संतापल्याने त्यांनी घोषणाबाजी सुरू केली.

Onion Farmers Agitation, Chandwad
Shivaji chumbhale Politics: शिवाजी चुंभळे यांचा पिंगळे यांच्यावर पलटवार, "देविदास पिंगळे यांच्या कार्यकाळातच भ्रष्टाचार झाला"

परिस्थिती हाताबाहेर गेल्याने चांदवड बाजार समितीचे लिलाव बंद पडले. यावेळी व्यापारी देखील पुरेशा संख्येने उपस्थित नव्हते. त्यामुळे लिलावाची स्थिती अधिकच बिकट झाली. काही काळ लिलाव बंद झाले.

Onion Farmers Agitation, Chandwad
Girish Mahajan Politics: ‘द्राक्ष निर्यातदारांची पंढरी’ भाजपला जिंकायचीच! मंत्री गिरीश महाजन यांच्या घोषणेनं विरोधकांची ‘बत्ती गुल’!

त्याची प्रतिक्रिया म्हणून शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे आंदोलन सुरू केले. संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. त्यामुळे प्रदीर्घ काळ वाहतूक कोंडी झाली. त्यात पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

यावेळी शिवसेनेचे नितीन आहेर, विलास भवर, राजेश भवर, माजी सभापती संजय जाधव, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर आदी नेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. या नेत्यांनीही आंदोलनात सहभागी झाले.

डोंगराळे येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्त्या झाली. त्यामुळे आधीच परिसरात तणावाची स्थिती होती. त्याचे पडसाद म्हणून मालेगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, सौंदाणे आदी बाजार समित्या दोन दिवसांपासून बंद होत्या. या भागातील कांदा उत्पादक चांदवड बाजार समितीत आले होते. त्यामुळे कांद्याची आवक वाढली. त्यातून परिस्थिती आता बाहेर गेली.

यावेळी काँग्रेस पक्षातून नुकतेच भारतीय जनता पक्षात गेलेले माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एरवी कांदा उत्पादकांच्या प्रत्येक समस्येला भाजप पक्षाला जबाबदार धरणाऱ्या कोतवाल यांनी यावेळी अतिशय सौम्य भूमिका घेतली. फिरली लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी सूचना त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचा प्रश्न गंभीर बनला होता. विधानसभा निवडणुकीतही ती समस्या कायम राहिली. आता नगरपालिका निवडणुकीचा प्रचार रंगत आला असतानाच पुन्हा कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याची चर्चा आता सुरू झाली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com