Dadaji Bhuse News: कांदा प्रश्नी दादा भुसे अॅक्शन मोडवर; नाफेडच्या अधिकाऱ्यांची बोलवली बैठक

राज्यात अवकाळी पावसामुळं अनेक भागांतील शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Dadaji Bhuse
Dadaji BhuseSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: राज्यात कांदा प्रश्नावरुन राजकारण तापलं असताना नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी कांदा प्रश्नाबाबत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नाफेडच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. कांद्याला प्रती क्विंटल 200 रुपये भाव द्यायचा की 500 रुपयाचं अनुदान द्यायचं यावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे दादा भुसे (Dada Bhuse) आजच्या या बैठकीत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील कांदा कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतरकरी मोठ्या संकटात सापडला आहे. याच मुद्यावरुन सभागृहातही विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. याशिवाय कांद्याच्या मुद्द्यावरुन विविध ठिकाणचे शेतकरीही आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारही कांदा प्रश्नावर मार्ग काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

Dadaji Bhuse
Maharashtra News : शिंदे सरकारचा अजब कारभार; नुकसानीचे पंचनामे सुरु असतानाच ३६ तहसिलदारांच्या बदल्या

दरम्यान, नाफेडच्या माध्यमातून तीन कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहे, बाजार समितीमध्येही लवकरच कांदा खरेदी केंद्रे (Onion buying centers) सुरु केली जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात दिली होती. त्यानुसार नाफेडच्या माध्यमातून बाजार समितीच्या बाहेर कांद्याची खरेदी सुरु झाली आहे. पण तरीही खरेदीत आणखी वाढ करण्याची मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.

तर दुसरीकडे कांद्याच्या मुद्द्यावरुन चांदवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तर बैठकीनंतर दादा भुसे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. चांदोरी, पिंपळगाव बसवंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दादा भुसे पाहणी करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com