स्वार्थासाठी ग्रामस्थांमध्ये दिशाभूल करण्याचे षड्यंत्र

माजी आमदार रघुवंशी यांच्या उपस्थितीत आष्टा येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन
Chandrakant Raghuwanshi
Chandrakant RaghuwanshiSarkarnama

नंदुरबार : विरोधकांकडून (Nandurbar) स्वतःच्या स्वार्थासाठी समाजात दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. जनतेची कामे करायची तर सोडाच मात्र त्यांच्यात गैरसमज निर्माण करून दिशाभूल करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याच्या आरोप शिवसेनेचे (Shivsena) नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांनी केला. (Shivsena leader made allegation on opponent for selfish politics)

Chandrakant Raghuwanshi
विधवा प्रथेला मूठमाती देणारी टाकळी ठरली पहिली ग्रामपंचायत

नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन माजी आ. रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, नंदुरबार शहराला आंबेबारा धरणातून पाणी पुरवले जाते. त्यामुळे परिसराला पाणी मिळत नाही असा गैरसमज ग्रामस्थांमध्ये विरोधकांकडून निर्माण करण्यात आला होता.आष्टे परिसरातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Chandrakant Raghuwanshi
मराठा समाजात छगन भुजबळांसारखे नेते नाहीत याचं वाईट वाटतंय!

स्थानिक विकास निधीतून आष्टा येथे मिनी बस स्टॅन्ड शेड, ग्रामपंचायत कार्यालय आवारात पेव्हर ब्लॉक व दुहेरी पाण्याच्या पंपाच्या हॅन्ड पंपाचे उद्‌घाटन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जि. प. उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, पं. स. सभापती कमलेश महाले, कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे, पं. स. सदस्य प्रल्हाद राठोड, संतोष साबळे, तेजस पवार, माजी पं.स. सदस्य दीपक मराठे, अविनाश भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

भजनी मंडळांना साहित्याचे वाटप

कार्यक्रमाप्रसंगी आष्टे येथील आदिवासी भातेजी महाराज भजनी मंडळांना भजन साहित्याचे शिवसेनेचे नेते, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प. उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. साहित्य मिळाल्याने भजनी मंडळाच्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com