Shivsena News; शिवसेना ठाकरे परिवाराचीच, कुणाच्या बापाची नाही!

शिवसेना ठाकरे गटातर्फे अनंत गिते यांच्या उपस्थितीत शिवगर्जना अभियानांतर्गत मेळावा झाला.
Varun Sardesai
Varun SardesaiSarkarnama

नाशिक : (Nashik) खरी शिवसेना (Shivsena) ही ठाकरे (Uddhav Thackarey) परिवाराचीच आहे, ती कुणाच्या बापाची नाही. शिवसेनेचे अस्तित्व कुणी संपवू शकत नाही, अशा शब्दात युवासेना (Yuvasena) सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी भाजप-शिंदे गटाचा समाचार घेतला. (Yuvasena leader Varun Sardesai warns Shinde Government)

Varun Sardesai
Chhagan Bhujbal News: मुख्यमंत्री म्हणतात मी शेतकरी, मग कांदा प्रश्न सोडवा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवगर्जना अभियानानिमित्त सातपूर येथे मेळावा झाला. या मेळाव्यात श्री. गीते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. मेळाव्याला मोठी गर्दी होती.

यावेळी सरदेसाई म्हणाले, जनता या सरकारच्या विरोधात असल्याने ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत. शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांनी संघटित राहून महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेली जनहिताची, विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवावी.

यावेळी ज्येष्ठ नेते अनंत गिते म्हणाले, ‘शिवसेनेला संकट नवीन नाही. यापूर्वी अनेक संकटे परतवून लावली. सत्ता गेल्याचेही दु:ख नाही. सत्तेचा मोह आम्ही कधी केला नाही. त्याउलट सत्तेसाठी वाट्टेल ते, अशी स्थिती भाजपासह (ऴऱझ) काही पक्षांची आहे. जनता त्यांना धडा शिकवेल.

Varun Sardesai
Nashik News; अहो पडळकर, सांगा आता मुके, बहिरे कोण हो?

श्री. गिते पुढे म्हणाले, गद्दारी करून आलेल्यांचे सरकार औटघटकेचे आहे. त्याबाबत जनतेत अतिशय संताप आहे. जनतेतील या संतापाची झळ भारतीय जनता पक्षाला सोसावी लागेल. त्यामुळे गरज संपल्यावर भाजपचे नेतेच हे सरकार पाडतील.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्यापासून माझ्यासारखे सर्व ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते युवासैनिकांप्रमाणे सक्रीय झाले आहेत. आता यापुढे जे काही घडवायचे आहे, त्यासाठी कार्यकर्ते, नेत्यांना काम करणे आवश्यक आहे.

गद्दारांविरुद्ध राज्यातील जनतेत प्रचंड चीड आणि संताप दिसून येत आहे. त्यांच्याबरोबर आपण राहिलो तर आपणही नेस्तनाबूत होवू याची खात्री आता भाजपला झाली आहे, यामुळे हे सरकार भाजपच पाडेल.

Varun Sardesai
Budget Session : गळ्यात कांदा-कापसाच्या माळा : भाव नाही मिळाला तर कांद्यासारखं सोलून काढू; विरोधक आक्रमक !

ते पुढे म्हणाले, सत्ता घेऊन थांबले असते तर समजू शकलो असतो. पण, शिवसेना संपविण्याची भाषा हे करीत आहेत. आमची निष्ठा, चिन्ह आणि पक्ष म्हणजे ठाकरे कुटुंब आहे, हा निर्धार सर्वांनी केला आहे. विश्वासघात करणाऱ्या फितुरांना आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू, अशी शपथ अनंत गीते यांनी दिली.

केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वाढलेली बेरोजगारी, महागाई यासह अनेक समस्या जनतेपर्यंत पोहोचवा. भाजपाच्या जनहितविरोधी कारभाराविरुद्ध जनतेत जागृती निर्माण करा, असे आवाहन उपनेत्या संजना घाडी यांनी केले. आगामी निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे माजी आमदार विजय औटी यांनी सांगितले.

Varun Sardesai
Nawab Malik : मलिकांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब : किडनी निकामी झाल्याची वकीलांची माहिती..

उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आदींची भाषणे झाली. माजी महापौर विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, महेश बडवे, सचिन मराठे, प्रशांत दिवे, मधुकर जाधव, दीपक दातीर आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com