Budget Session : राज्याच्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, पीकाच्या भाव या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक आंदोनाला सुरूवात केली आहे. डोक्यावर कांद्याची टोपली आणि गळ्यात कांद्यांच्या माळा घालून विरोधकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
गेल्या महिन्यापासून कांदा पीकाच्या दरांमध्ये सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही. यामुळे कांदा पीक घेणारे शेतकरी आक्रमक झाले असून, कांद्याला योग्य भाव मिळायलाच पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधक आमदार निदर्शने करीत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी कांदा पीकाला योग्य भाव मिळावा, यासाठी विधिमंडळात कांदे घेऊन पोहचले. कापूस, लसूण आणि कांद्यांचे माळा गळ्यात घालून घोषणाबाजी करताना दिसले. जर शेतकऱ्यांच्या पीकाला, योग्य भाव मिळाला नाही तर, कांद्यासारखंच सोलून काढू, असा थेट इशारा विरोधकांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.