लखमापुर : कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह विधान (Offensive statement) चांगलेच भोवले आहे. गेले तीन दिवस राज्याच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात त्यांचा निषेध (Protest) होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले जात आहेत. या प्रकाराने सत्ताधारी व विशेषतः शिंदे गटाचे (Sinde group`ss ministers) मंत्री चांगलेच धास्तावल्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. (Protest against Minister Abdul Sattar all over state)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात राज्याचे कृषी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद दिंडोरी तालुक्यात बघावयास मिळाले. दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्ताराच्या प्रतिमेस जोडोमारो आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त करून त्यांच्या मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी सत्तार यांच्याबाबत सर्वस्तरावर निषेध होत असल्याने अन्य मंत्रीही धास्तावल्याची चर्चा होती.
शिंदे सरकारमधील गद्दार कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना सत्तेचा उन्मत्तपणे आल्यामुळे वाटेल ते वक्तव्य करत आहे. त्यांच्या या प्रवृत्तीतून त्यांना कुप्रसिध्दीची हाव आली असल्याचे निदर्शनास येते. त्यांनी अतिशय खालच्या शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य करणे मंत्री असलेल्या माणसाला शोभत नाही. अब्दुल सत्तार यांनी मर्यादा सोडून गलिच्छ भाषेत अश्लील शब्दात टीका करणे हे त्यांच्या पदाला शोभत नाही आणि ही महाराष्ट्राची संस्कृती देखील नाही. हीच त्यांची भाषा आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने मंत्री पदाच्या राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार पंकज पवार, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, विश्वासराव देशमुख, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, राजेंद्र ढगे, श्याम हिरे, तुकाराम जोंधळे, भाऊसाहेब बोरस्ते, नरेश देशमुख, दिनकरराव जाधव, छबू मटाले, हिरामण गावित, तौसिफ मणियार, भाऊसाहेब पाटील, संगीता राऊत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.