धुळे : सर्वच शासन वेळोवेळी वीजेसंबंधी स्थानिक पायाभूत सुविधांसाठी अपग्रेडेशन व बळकटीकरणासाठी कोट्यवधींचा निधी देत असते. तरीही आठवड्यापासून धुळेकर (Dhule) वीज कंपनीच्या (Power compony) गलथान कारभाराचा अनुभव घेत आहेत. जनता उकाड्याने हैराण आणि अधिकाऱ्यांच्या दिमतीला एसी, कुलर दिसतात. कंपनीचा भोंगळ कारभार सुधारला नाही, तर अधीक्षक अभियंत्यांच्या निवासस्थानी झोपमोड आंदोलन करु, असा इशारा काँग्रेसने (Congress) दिला. (Congress agitation against power issue at Dhule)
पावसाळा सुरु होताच शहरासह जिल्ह्यातून वीज वितरण कंपनीबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शहर शाखेने मंगळवारी साक्री रोडवरील कंपनी कार्यालयावर मोर्चा काढला.
संतप्त मोर्चेकऱ्यांनी शहराध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वादळीवारा आणि पाऊस सुरू होताच अनेक तास वीजपुरवठा खंडित राहातो. प्रसंगी काही वेळाचे ब्रेकडाऊन जनता समजून घेते. मात्र, तक्रारीचे निवारण होण्यास बारा- बारा तासांचा विलंब होतो.
संयमशील नागरिकांच्या तक्रारींची वीज कर्मचारी नोंदही घेत नाही. त्यामुळे वीज कंपनीबद्दल जुने धुळे, मुस्लीमबहुल भाग, मार्केट परिसर, मोगलाई भागात तीव्र असंतोष दिसतो. वीज कंपनीच्या सबस्टेशनमध्ये तत्काळ लॅण्डलाईन टेलिफोन कार्यरत करावा, प्रसार माध्यमे, रुग्णालय परिसरात कायम वीजपुरवठा राहील याची दक्षता घ्यावी. विविध वीज कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत दिवसा व रात्रीची तक्रार निवारणासाठी ड्यूटी लावा, धोकादायक पोल आणि वायर बदलण्यासाठी उपाययोजना कराव्यात, वीज पुरवठ्याबाबत तक्रारी दूर होईपर्यंत वसुली थांबवावी आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
शहराध्यक्ष माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात राजेंद्र खैरनार, बानूबाई शिरसाट, दीपक पाटील, खलीद अन्सारी, मुज्जफर हुसेन, भटू महाले, हरीभाऊ अजळकर, भगवान कालेवार, डॉ. अनिल भामरे, साबीर शेख, जावेद देशमुख, आयुब खाटीक, सदाशिव पवार, आनंद जावडेकर, अॅड. सुधीर जाधव, जाविद शाह, डॉ. दरबारसिंग गिरासे, गुड्डू शेख, शरिफ पिंजारी, सलमान मिर्झा, प्रा. जसपालसिंह सिसोदिया, सदाशिव पवार, प्रकाश शर्मा, अश्पाक शेख, शोएब अन्सारी, रिझवान अन्सारी आदी सहभागी झाले.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.