Pahalgam terror attack : 'बदल्यानंतरच सत्कार स्वीकारणार, आता फक्त 'अ‍ॅक्शन' पाहा'; PM मोदींचा 'पाक' इरादा काय? केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचे सूचक संकेत

Central Minister CR Patil Reacts in Shirdi to PM Modi Possible Action on Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शिर्डी इथं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील केंद्रातील मोदी सरकार काय प्रत्युत्तर देणार, यावर सूचक प्रतिक्रिया दिली.
CR Patil
CR PatilSarkarnama
Published on
Updated on

Terrorist attack India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे पुरावे समोर येत आहे. या हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारच्या उच्चस्तरीय बैठका सुरू आहेत.

मोदी सरकारकडून या दहशतवादी हल्ल्यावर मोठं प्रत्युत्तर मिळणार, या विचारानं पाकिस्तानची झोप उडाली आहे. हे काय प्रत्युत्तर असेल, यावर केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सूचक संकेत शिर्डी इथं दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी (Shirdi) मतदारसंघ असलेल्या राहाता तालुक्यात केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी त्यांच्या सत्काराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. मात्र जोपर्यंत पहलगाम घटनेचा बदला घेतला जाणार नाही, तोपर्यंत जाहीर सत्कार स्वीकारणार नसल्याचा संकल्प केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी केला आहे.

CR Patil
Mahayuti government cabinet meeting : CM फडणवीसांसह चौंडीला येणारे मंत्रिमंडळ 'पुरणपोळी', 'शिपी आमटी', 'शेंगोळ्यां'वर ताव मारणार; सभापती शिंदे जेवणाचा खर्च उचलणार

केंद्रीय मंत्री पाटील यांच्या या संकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणार, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं हे प्रत्युत्तर जोरदार असेल, असे संकेत केंद्रीय मंत्री पाटील यांच्या सूचक संकेतातून मिळाले. सी. आर. पाटील यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

CR Patil
Hania Aamir : पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानी सैन्याचा ब्रेन: व्हायरल पोस्टवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा

या कार्यक्रमानंतर सी. आर. पाटील माध्यमांसमोर आले. ते घाईत होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं काय प्रत्युत्तर असेल, यावर बोलताना, 'आता ॲक्शन पहा..ॲक्शन!' एवढचं वाक्य बोलले. हे वाक्य उच्चारताना पाटील यांची देहबोली बरच काही सांगून केली. सुरुवातीला सत्कार टाळला, त्यानंतर एकाच वाक्यात दिलेली सूचक प्रतिक्रिया, त्यामुळे पाकिस्तानाला या दहशतवादी हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर मिळणार असे संकेत मिळू लागले आहेत.

राहाता तालुक्यातील अस्तगाव इथं महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा एक अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्या हस्ते झाले. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.

सिंधू करार स्थगिती...

दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाला धडा शिवकण्यासाठी भारताने सिंधू पाणी करार (IWT) स्थगित केला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे . पाकिस्तान 80% शेतीसाठी सिंचन करतो आणि 90% अन्न उत्पादनासाठी या नदीच्या खोऱ्यावर अवलंबून आहे. परंतु, पाकिस्तानला त्याची नवीनतम डोकेदुखी सिंधू नदी किंवा भारताच्या कृतींमुळे होत नाही. हे संकट स्थानिक पातळीवर निर्माण झाले आहे. सिंधू नदी प्रणालीमध्ये प्रवेश करणाऱ्या वादग्रस्त लष्कराच्या पाठिंब्याने कालवा प्रकल्पामुळे सिंधमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत, ज्यामुळे पंजाबला जाणारी वाहने बंद पडली आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारने कालवा प्रकल्प स्थगित केला असला तरी, 12 दिवसांपासून नाकेबंदी सुरू आहे. परिस्थिती अजून संपलेली दिसत नाही आणि इस्लामाबादच्या समस्या वाढतच आहेत. आर्थिक नुकसानही खूप मोठे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com