District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम; संचालक समजून व्यापाऱ्याचे अपहरण, सात तोळे सोने लुटले, पारनेरमधील घटनेने खळबळ

Businessman Kidnapped, Robbed After Mistaken Identity in Parner : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर दोन कारमधून आलेल्या सात ते आठ जणांची कारवाई; अपहरण, मारहाण आणि रस्ता लुटीचा गुन्हा दाखल.
District Bank election kidnapping case
District Bank election kidnapping caseSarkarnama
Published on
Updated on

Parner Kidnap Case: अहिल्यानगरमधील जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात रविवारी भरदिवसा अपहरण आणि लुटीची धक्कादायक घटना घडली. सेवा संस्थेचा संचालक असल्याच्या गैरसमजातून सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी एका किराणा व्यावसायिकाचे अपहरण केले.

मात्र, संबंधित व्यक्ती संचालक नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील सुमारे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावून त्यांना रस्त्यावर सोडून पलायन केले.

याप्रकरणी अशोक फुलाजी चेडे (रा. पारनेर) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात सात ते आठ आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण आणि रस्ता लुटीचा गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अशोक चेडे हे वैयक्तिक कामानिमित्त चाकण (जि. पुणे) येथे गेले होते. तेथून पारनेरकडे परत येत असताना नगर-कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या शिवारात त्यांच्या कारला लाल रंगाच्या एका कारने ओव्हरटेक करून अडवले.

District Bank election kidnapping case
Beg Gang Police Action : आकाश दुबय्या हत्येनंतर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये पोलिस; 'बेग टोळी'च्या अड्ड्यावर छापा, गावठी पिस्तूल जप्त

व्यापाऱ्याला धरण परिसरात नेले

यानंतर दुसऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी चालकासह चेडे यांना मारहाण केली आणि जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवून मांडओहळ धरण परिसरात नेले.

District Bank election kidnapping case
Nitin Gadkari Ethanol Case : नितीन गडकरींच्या नावाने इथेनॉलबाबत दिशाभूल? सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा

सात तोळ्याचे सोने लुटले

तेथे आरोपींनी चेडे यांची ओळख विचारल्यानंतर ते सेवा संस्थेचे संचालक नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यातील पाच तोळ्यांची सोन्याची साखळी असा सुमारे सात तोळ्यांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर चेडे यांना रस्त्यावर सोडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात चुकीच्या ओळखीमुळे हे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनेमागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com