Beg Gang Police Action : आकाश दुबय्या हत्येनंतर 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये पोलिस; 'बेग टोळी'च्या अड्ड्यावर छापा, गावठी पिस्तूल जप्त

Police raid Beg Gang hideout; citizens demand MCOCA action : आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर वाढलेल्या जनक्षोभाचा परिणाम; सोनू बेगसह तिघांवर गुन्हा, पसार दोन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात.
Shrirampur Police Action
Shrirampur Police ActionSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Police Raid : हाॅटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरमधील गुन्हेगारीविरोधात एकटवलेल्या श्रीरामपूरकरांच्या बंदच्या नैतिक दबाव जिल्हा पोलिस प्रशासनावर चांगलाच वाढला आहे.

पोलिसांनी श्रीरामपूरमध्ये छापेमारी करत 'बेग टोळी'ला टार्गेट करत पहिली कारवाई केली. ही कारवाई केली असली तरी श्रीरामपूरकरांनी 'बेग टोळी'वर मकोका कारवाईची मागणी लावून धरली आहे.

अहिल्यानगर जिल्हा पोलिस (Police) दलाच्या शीघ्र कृती दलाने, श्रीरामपूरमधील सरस्वती काॅलनीतील छाजेड अपार्टमेंट येथे कारवाई करत, जयप्रकाश अशोक बेग ऊर्फ सोनू (रा. सरस्वती काॅलनी, श्रीरामपूर), शिवांजय बाळासाहेब उंडे (रा. पढेगाव, श्रीरामपूर) आणि एक महिला अशा तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

श्रीरामपूरमधील (Shrirampur) हनुमान मंदिरामागील सरस्वती काॅलनीतील एक विना रंगाच्या इमारतीत काही गुंडांनी शस्त्राचा वापर करत दोन मुलींना डांबून ठेवल्याची शीघ्र कृती दलाला माहिती मिळाली होती. त्यानुसार शीघ्र कृती दलाच्या पथकाला छाजेड अर्पाटमेंटवर छापा घातला. तिथं छाजेड अर्पाटमेंटमधील पहिल्या फ्लॅटमध्ये शिवांजय उंडे याने भाडे कराराने दिल्याची माहिती पथकाला मिळाली.

Shrirampur Police Action
Shrirampur Schools Closed : श्रीरामपूर बंदचा तिसरा दिवस; 16 हजार विद्यार्थी शाळा-महाविद्यालयांपासून दूर, गुन्हेगारीविरोधी लढ्याला नवे बळ

शिवांजय उंडे याने हा फ्लॅट त्याची बहीण आणि दाजी सोनू बेग वापरत असल्याची माहिती दिली. या फ्लॅटची छडती घेतल्यावर, देशी बनावटीचे पिस्तूल, दोन कडतूस, एका महिलेची हाॅस्पिटलची फाइल, यु सेवा टिन मेकर्स या दुकानाचे सोनूभाऊ असे लिहिलेले मोटारीचे बिल, कोरे चेकबुक, वसंत पवार याच्या नावाचे एटीएम कार्ड, असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Shrirampur Police Action
Shrirampur Crime Protest :'टोपीपेक्षा भगव्या उपरण्याचीच भीती'; श्रीरामपूर हत्याकांडानंतर भाजपच्या महिला नेत्याचे खळबळजनक विधान

बेगची संघटीत गुन्हेगारी

सोनू बेग हा संघटीत गुन्हेगारी टोळी चालवतो. त्याच्याकडील संघटीत टोळ्यामध्ये अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकं आहेत. या गुंडांकडून आर्थिक लाभ मिळेल, या उद्देशाने बेकायदेशीर धंदे चालवतो. यातून हा छापा घालण्यात आल्याचे श्रीरामपूर पोलिसांनी सांगितले.

सोनू बेगविरोधात सतरावा गुन्हा दाखल

गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले गावठी पिस्तूल कशासाठी आणले होते? विक्री करणार होता का? वेगळा काही उद्देश होता का? याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, सोनू बेग याच्याविरोधात वेगवेगळ्या स्वरुपाचे 16 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आता बेकायदेशीर गावठी पिस्तूल आणि दोन काडतूस बाळगण्याप्रकरणी सतरावा गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पसार दोघांना अटक

दरम्यान, साहिल उर्फ बाबा अन्वर शेख (रा. सिध्दार्थनगर, श्रीरामपूर) आणि प्रसाद बन्सी उदमले (रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर) हे दोघे वेगवेगळ्या गुन्ह्यात पसार होते. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी श्रीरामपूरमधील गुन्हेगारीवर वाकडी नजर केली असून, कारवाईला सुरूवात केल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com