BJP Politics : सदस्य नोंदणी अभियानाकडे भाजप आमदारांची पाठ; विजय चौधरी म्हणाले, 'हे नाही चालणार'

BJP membership campaign updates : भाजपच्या सदस्य नोंदणीचा अहिल्यानगर जिल्ह्याचा आढावा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी घेतला.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील साईंच्या शिर्डीत भाजपने महाविजय अधिवेशन घेत, सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान घेतलं होते. भाजपच्या आमदारांनीच सदस्य नोंदणीकडे पाठ फिरवल्याने हे आव्हान अधिकच अवघड बनलं आहे.

आमदारांच्या पाठ फिरवण्याच्या प्रकारावर कार्यकर्त्यांनी थेट पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी अहिल्यानगर दौऱ्यात याबाबत नाराजी व्यक्त करताना आमदारांचे कान टोचले. 'गरज सरो वैद्य मरो', असे खपवून घेणार नाही. पक्षामुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे पक्ष नाही, याची जाणीव ठेवा, असे विजय चौधरी यांनी ठणकावले आहे.

अहिल्यानगर भाजपच्या (BJP) संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाची आढावा बैठक झाली. या बैठकीकडे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी पाठ फिरवली. बैठकीला एकही भाजप आमदार उपस्थित नव्हता. विभागीय संयोजक दादा जाधव यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी उपस्थित होते.

BJP
Top Ten News : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा तापला; भाजप आमदार टी.राजा यांचं मोठं विधान!- वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

महामंत्री विजय चौधरी यांचे भाजप आमदारांच्या अनुपस्थितीबद्दल विचारल्यावर, त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे हे संघाच्या बैठकीसाठी पुणे (PUNE) इथं गेले होते. इतर आमदारांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी घेतली होती, असे स्पष्टीकरण दिले. परंतु पुढील काळात अशा सबबी चालणार नाहीत. पक्षामुळे आपण आहोत, हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे विजय चौधरी यांनी म्हटले.

BJP
Congress Politics : राहुल गांधींच्या विश्वासूची छुट्टी? तर प्रियंका गांधींच्या शिलेदाराला प्रमोशन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढाव्यात की, महायुतीमार्फत याबद्दल चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीतील महाविजयामुळे सदस्य नोंदणीस प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याला 7 लाख 75 हजार 600 सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 70 हजारांचे उद्दिष्ट असणार आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 25 हजार 715 नोंदणी झाले आहेत. 31 जानेवारीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com