Congress Politics : राहुल गांधींच्या विश्वासूची छुट्टी? तर प्रियंका गांधींच्या शिलेदाराला प्रमोशन

Rajasthan Sachin Pilot Delhi Assembly elections national level Congress : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी आजारी पडल्याने प्रचाराची धुरा सचिन पायलट संभाळत आहेत.
Sachin Pilot 1
Sachin Pilot 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीनंतर देशातील विविध भागात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची निराशाजनक कामगिरी झाली. आता काँग्रेस पुन्हा दिल्ली विधानसभा निवडणुकीला समोरं जात आहे. इंडिया आघाडीत असलेले सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दिल्ली आमने-सामने आला आहे.

प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच, राहुल गांधी आजारी पडले आहे. त्यांच्यानंतर प्रचाराची धुरा राजस्थानचे काँग्रेसचे खासदार सचिन पायलट संभाळत आहे. प्रचारातील सुरळीतपणामुळे दिल्ली काँग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. यामुळे राहुल गांधी यांचे विश्वासू के. सी. वेणुगोपाल यांना छुट्टी मिळणार अशी चर्चा रंगली आहे.

राजस्थानमध्ये भाजपने (BJP) काँग्रेसकडून सत्ता हिसकावू घेतली. त्यामुळे सचिन पायलट यांचे मुख्यमंत्रि‍पदाचे स्वप्न भंगले. भाजपमध्ये जाण्याचा देखील चर्चा या फक्त वावड्याच ठरल्या. सत्ता नसल्यामुळे काँग्रेसमध्ये राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय संघटनेत सचिन पायलट सक्रिय झाले. यातून त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून प्रियंका गांधी-वाड्रा यांची मर्जी घेतली. यामुळे सचिन पायलट यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सध्याचा प्रवास सुसाट, असून त्यांना प्रमोशन मिळणार असे संकेत मिळत आहेत.

Sachin Pilot 1
Santosh Deshmukh Murder Case : 'वाँटेड' कृष्णा आंधळे..; आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया (पाहा VIDEO)

सचिन पायलट काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय कार्यकारिणीत महासचिव म्हणून कार्यरत असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सचिन पायलट दिल्लीत तळ ठोकून आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा, प्रचाराकांची यादी सर्व काही प्रमुख जबाबदारी सचिन पायलट यांच्या स्वाक्षरीनं पार पडली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचे विश्वासू के. सी. वेणुगोपाल यांचे काय होणार? अशी चर्चा आहे.

Sachin Pilot 1
Presidents Medal 2025 : पोलिसांच्या शौर्याचा सन्मान; महाराष्ट्राला मिळाली 48 पोलिस पदक

राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सध्या महासचिव पद आहे. सचिन पायलट यांची महाराष्ट्रासह दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष संघटनेतील कामकाजचे नियोजन पहिल्यास, ते महासचिव पदावर वेगानं पुढ जात आहे. त्यामुळे के. सी. वेणुगोपाल यांची छुट्टी होणार की नाही यावर चर्चा होऊ लागल्या आहेत.

सचिन पायलट सध्या काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांची या पदावर कायम वर्णी लागून, त्यांना अच्छे दिन येणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे. सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांच्याबरोबर कार्यक्रमातही सचिन पायलट मध्यंतरी दिसले होते. राहुल गांधी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असतानाच, ते आजारी पडले आहे. त्यामुळे काही प्रचार सभांना ते अनुपस्थितीत होते. त्यावेळी प्रचाराची धुरा सचिन पायलट पेलत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com