
Maharashtra Panchayat Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे अजून निश्चित नसले, तरी प्रशासनाने त्यांच्या पातळीवर तयारी सुरू केली आहे.
राज्यातील ग्रामपंचयातीचे सरपंच पदाच्या आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 हजार 586 ठिकाणी सरपंच पद राहणार आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच, इच्छुकांनी बांधणीला सुरवात केली आहे.
राज्यातील 2025 ते 2030 या पाच वर्षाच्या कालावधीत सरपंच पदाचे आरक्षण सरकारच्यावतीने निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र (Maharashtra) शासन राजपत्र यामध्ये 5 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात राज्यात अनुसूचित जातीसाठी 3 हजार 258, अनुसूचित जमातीसाठी 1 हजार 84, ओबीसीसाठी 6 हजार 115 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 13 हजार 586 ठिकाणी सरपंच पद राहणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींसाठी, 2025-2023 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी, सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. निवडणूक लांब असली, तरी आरक्षण (Reservation) जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 1 हजार 223 ग्रामपंचायतींपैकी 624 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात 312 ठिकाणी महिलांचा समावेश असणार आहे.
ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींसाठी 330 ठिकाणी सरपंच पदाचे आरक्षण राहणार असून यात 165 महिलांना संधी मिळणार आहे. तर 119 ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून यात 60 ठिकाणी महिला, तसेच दीडशे ठिकाणी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून यात 75 महिला सरपंच यांचा समावेश राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.