
Ahilyanagar News : पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथ यात्रेला होळीपासून सुरवात होत आहे. महिनाभर चालणाऱ्या यात्रेचे मढी ग्रामपंचायतीकडून तयारी सुरू आहे. यातच मढी ग्रामपंचायतीने यात्रेमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांच्या बंदीचा ठराव मंजूर केला आहे. यावरून वाद उफळला आहे.
वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ 'एमआयएम'ने देखील या ठरावाविरोधात आक्रमक झाली आहे. संविधान विरोधी अन् देशात संताप निर्माण करणाऱ्या या ठरावाची चौकशी करून मढी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसदस्यांचे पद बरखास्त करून, गुन्हा दाखल करावा, अशी मागणी 'एमआयएम'चे जिल्हाध्यक्ष डाॅ. परवेज अशरफी यांनी केली आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) डाॅ. अशरफी यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्याबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अल्पसंख्याक आयोगाचे देखील लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाची चौकशी करून लोकप्रतिनिधींनी पदभार घेताना संविधान घेतलेल्या शपथेचा भंग केला म्हणून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
डाॅ. परवेज अशरफी म्हणाले, "महाराष्ट्राबरोबरच भाजप (BJP) सरकार असलेल्या इतर राज्यात जातीवादी संघटन सक्रिय झाल्याचे दिसते. या संघटना फक्त मुस्लिम अल्पसंख्याक समाजाविरोधात वारंवार चिथावणी देण्याचे प्रकार करत आहेत. धार्मिक स्थळांबरोबर मु्स्लिमांविषयी अपप्रचारावर भर दिला जात आहे. मुस्लिमांची आर्थिक कोंडीचा प्रयत्न होत आहेत. एकप्रकारे मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकण्याचे प्रकार घडत आहे". जातीवादी संघटनांच्या या प्रकारामुळे दोन्ही बाजूने असुरक्षितेची भावना लोकांमध्ये अधिक बळावली चालली आहे. हे समाजासाठी, पुढच्या पिढीसाठी घातक असेच आहे, असेही अशरफी यांनी म्हटले.
पाथर्डी तालुक्यातील मढी इथं कानिफनाथ देवस्थानची यात्रा सुरू होत आहे. या यात्रेला मोठी पारंपारिक परंपरा आहे. पण, मढी ग्रामपंचायतीने यावेळी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना येण्यास बंदी घातली आहे. ही यात्रा म्हणजे, दु:खाचा काळ असतो. यात अनेक धार्मिक परंपरा असतात. त्याच मुस्लिम व्यापाऱ्यांकडून पाळल्या जात नाही, असा दावा करत ही बंदी घालण्यात आली आहे. तसा मढी ग्रामपंचायतीने ठराव घेतला असून, त्यावरून वादंग सुरू झाला आहे.
मढी ग्रामपंचायतीच्या या ठरावाविरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी यांची काल भेट घेत निवेदन दिले. या ठरावाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याचबरोबर 'एमआयएम' देखील या ठरावाविरोधात आक्रमक झाली आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घातल्याचा हा प्रकार देशात आगीसारखा पसरला आहे. हा ठराव म्हणजे, संविधानाने घालून दिलेल्या मुलभूत मार्गदर्शन तत्त्वाचे उल्लंघन केले असून, यावर कारवाईची मागणी 'एमआयएम'चे डाॅ. परवेज अशरफी यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.