Ahmednagar News: "पाथर्डी तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियाबाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही. निवडणुका मॅनेज होतात. हा विरोधकांचा आरोप आश्चर्यजनक आणि हास्यास्पद आहे. निवडणुका घ्यायला त्यांना जमत नाही. मग कुठेतरी मतदार यादीची होळी करून त्यातून प्रसिद्धी मिळवायची. लोकांमध्ये यातून संभ्रम निर्माण केला गेला", अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते अॅड. प्रताप ढाकणे यांचे नाव न घेता केली.
पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघावर निर्विवाद वर्चस्व आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा एकदा प्रस्थापित केले. यानंतर झालेल्या विजय सभेत आमदार राजळे बोलत होत्या. (Pathardi Taluka Kharedi Vikri Sangh Election)
खरेदी विक्री संघाच्या एकूण सतरा पैकी सेवा सोसायटीच्या दहा जागेसाठी अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया होऊन दुपारनंतर मतमोजणी झाली. यात दहा उमेदवार संचालक म्हणून राजळे गटाचे निवडून आले. खरेदी-विक्री संघाचे एकूण 17 संचालक असून यापूर्वीच सात संचालक हे राजळे गटाचे बिनविरोध निवडले गेले होते.
सेवा सोसायटीच्या दहा जागेसाठी एक उमेदवार अतिरिक्त राहिल्याने या दहा जागेवर रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदान झाले. 96 मतांपैकी 95 मतदारांनी मतदान केले. खरेदी-विक्री संघाच्या सतरा पैकी सतरा जागेवर राजळे गटाचे संचालक निवडून आणत प्रताप ढाकणेंना धक्का देत पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांनी सहकारावर आपला कब्जा काबिज केला आहे.
राजळे म्हणाल्या, "या निवडणुकीत विरोधकांनी अगोदरच पराभव स्वीकारला होता. त्यामुळेच या निवडणुकीत स्टंटबाजी करून विरोधकांनी काढता पाय घेतला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर विरोधक आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप करत बसले. पाथर्डीची निवडणूक नव्हती, तर संपूर्ण जिल्हाभर या निवडणुका होत्या. आमच्या सांगण्यावरून निवडणुकी होत नाही. त्यामुळे विरोधकांची निवडणूक मॅनेजची भाषा हास्यास्पद आहे. आता सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून येणाऱ्या फेब्रुवारीनंतर लोकसभा तर त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असेही आमदार राजळे म्हणाल्या.
भगवान आव्हाड (८७), गंगाधर गर्जे (८९), कैलास देवढे (८८), राम पठाडे (८७), संदिप पठाडे (८६), भीमराव पालवे (८८), नवनाथ भवार (८६), विठ्ठल मरकड (८८), आण्णा वांढेकर (८९), मच्छिंद्र सावंत (८७) हे विजयी झाले.
सिंधू अशोक साठे, सुनीता मधुकर काटे (महिला प्रतिनिधी), अशोक लक्ष्मीनारायण मंत्री, बाबासाहेब श्रीपती चितळे (व्यक्तिगत सभासद प्रतिनिधी), पोपट मोहन कराळे (इतर मागास), पुरूषोत्तम भास्कर हजारे (विजाभज), संतोष श्रीधर भागवत (अनु.जाती-जमाती).
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.