Ajit Pawar On Government: राज्यातील सरकार लोकांच्या मनातून उतरले!

Ajit Pawar News: राज्य सरकार जर सर्वसामान्यांचे असेल तर वारेमाप जाहिराती कोणासाठी केल्या जात आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक (Nashik): सत्ताधाऱ्यांकडून (State Government) विरोधकांची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे अमाप साधनसंपत्ती आहे. मात्र हे राज्य सरकार शक्तीहीन आणि नपुसंक असल्याची भावना तयार होऊ लागली आहे. ते लोकांच्या मनातून उतरल्याचे कसबा, (Kasba) चिंचवडच्या (Chinchwad) निवडणुकीत स्पष्ट झाले. आपण (NCP) एकोप्याने लढून त्यांना त्यांची जागा दाखवू, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Why State Government spents crores on Advertisement in last seven months)

राज्य सरकारच्या प्रत्येक तंत्राला आपण उत्तर देऊ शकतो. ते आपण कसबा. आणि चिंचवड मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. मात्र आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकोप्याने काम करावे लागले, याची जाणीव ठेवावी.

Ajit Pawar
Ajit Pawar on SC comment : आजवरच्या कोणत्याही सरकारला नपुंसक असे हिणवलेले नाही!

श्री. पवार म्हणाले, सरकारचे काम चांगले आहे, असा त्यांचा दावा आहे. मग जाहिराती करण्याची गरज का पडते?. जाहिराती कोण करतो?. अहो लोक यांच्या जाहिराती बघायला तयार नाहीत, अशी स्थिती झाली आहे.

राज्य सरकारचे काय सध्या चालले आहे. ते कसे सत्तेत आले, हे जनतेला माहित आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. हे सरकार चांगले काम करत होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देत होते. कोरोनामध्ये जनतेला दिलास देण्याचे काम करीत होते. शेतकऱ्यांच्या अडचणींत धाऊन जात होते. उद्योग, रोजगार अशा विविध योजना व कार्यक्रम आम्ही करत होते. अनेक अडचणी असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि सहकारी पक्षांचे सरकार होते. अचानक काय घडले व सरकार कसे गेले हे जनतेला माहित आहे.

Ajit Pawar
Jayant Patil On Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडी कायम राहावी, ही शरद पवार इच्छा!

ते पुढे म्हणाले, आपल्याला वेगवेगळी लोकं भेटतील. लोकसभा निवडणूक लवकरच होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणूक होईल की नाही?, हे सांगता येत नाही. ते पुर्णतः राज्य सरकारच्या मर्जीवर अवलंबून आहे. तो त्यांच्या केंद्रीय नेत्यांचा विषय आहे. आपण मात्र त्याच्या तयारीत असले पाहिजे.

निवडणूक केव्हाही आली तरीही आपली तयारी असावी. त्यासाठी गट-तट, हा जवळचा तो लाबंचा असा विचार न करता. खरोखर जनमाणसात त्याची प्रतिमा विचारात घेऊन उमेदवारी दिली पाहिजे. त्यासाठी बुथस्तरावर सर्वसमावेषक समिती असली पाहिजे. त्यांचा संपर्क असला पाहिजे.

Ajit Pawar
Nashik APMC News : देविदास पिंगळे, बबनराव घोलप एकत्र आल्याने विरोधक अस्वस्थ!

या सरकारचा कारभार गोंधळाचा आहे. अर्थसंकल्प सादर केला. महिला स्वयंपाकाचा गॅस वापरतात, त्याचे दर कमी केले नाही. शेतकरी जे खते, किटकनाशके वापरतो, त्याच्या किमती कमी करायला काय अडचण होती. शेतीमालाला किंमत नाही. असे कसे चालेल. केवळ घोषणा करून कसे चालेल.

महामंडळ नव्हे कंपन्या

सरकारने विविध घटकांसाठी घोषणा केल्या व महामंडळांची घोषणा केली. मात्र महामंडळे काढलेली नाहीत. त्या कंपन्या आहेत. सरकारने कंपन्या काढल्या आहेत. लोकांची बनवाबनवी करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांचे मंत्री सभागृहात तर बसतच नव्हते. तुमच्या आमदारांना विचारा काय स्थिती होती. आम्ही किती संताप करायचो?. नियमानुसार सभागृह चालवावे. जनतेचे प्रश्न सुटावेत. बेरोजगारी दुर व्हावी म्हणून पायऱ्यांवर बसुन आम्ही आंदोलन करीत होतो. मात्र सरकारने काहीच केले नाही.

Ajit Pawar
Nashik ZP : सुहास कांदेंसाठी धावपळ...राहुल आहेरांकडे कानाडोळा!

मी असतो तर उलटे केले असते. 28 कोटी जाहिरातींना आणि पाचशे कोटी जनतेच्या मदतीसाठी दिले असते. नुसतेच सागंतात, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे ते सागंतात. असे सर्वसामान्यांचे सरकार असते का? असा प्रश्न पवार यांनी केला.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कोंडाजीमामा आव्हाड, रवीद्र पगार, नाना महाले, दिलीप खैरे, प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, कविताताई कर्डक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com