Hemant Godse & Government officials
Hemant Godse & Government officialsSarkarnama

राष्ट्रवादीच्या आमदार अहिरेंना झिडकारत शिंदे गटाच्या कार्यक्रमाला उसळली गर्दी

`राष्ट्रवादी`च्या विरोधानंतर शिंदे गटाच्या खासदार हेमंत गोडसे यांना काँग्रेसने बुस्टर देत खेळले राजकारण.

नाशिक : गिरणारे (Nashik) हा आदिवासी (Trible) बहुल परिसर म्हणजे काँग्रेसचे (Congress) आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचा हक्काचा गट. मात्र येथील आमदार राष्ट्रवादीच्या (NCP) सरोज अहिरे (Saroj Ahire)आहेत. येथे होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे गटाचे (Shinde Group) खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या सरकारी उपक्रमाला आमदार अहिरे यांनी विरोध केला होता. (NCP Congress given indirect support to Shinde Group`s MP Hemant Godse)

Hemant Godse & Government officials
पुढचा खासदार येईपर्यंत राणे भाजपमध्ये राहतील का? : आदित्य ठाकरेंनी डिवचलं

मात्र या संधीचे काँग्रेसने पडद्यामागची खेळी खेळत राजकीय संधीचेसोने केले. एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उपक्रमाला त्यांनी बुस्टर देत मोठी गर्दी केली. त्यामुळे आमदार सरोज आहेर यांची एकप्रकारे राजकीय कोंडी केली आहे. त्याचे भविष्यातही पडसाद उमटणार असल्याने आमदार अहिरे यांची वाट अवघड होऊ शकते.

Hemant Godse & Government officials
चंद्रकांतदादांचे मोठे विधान : नाराजांना मनवायची भाजप-शिंदे गटाकडे व्यवस्था!

खासदार हेमंत गोडसे यांनी आयोजित केलेला उपक्रम रद्द करण्यासाठी आमदार सरोज आहिरे यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांना पत्र दिले, मात्र आमदार अहिरे यांच्या विरोधानंतर गिरणारे (ता. नाशिक) येथे शनिवारी शासन आपल्या दारी हा उपक्रम झाला. विशेष म्हणजे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी करीत आमदारांच्या विरोधाला केराची टोपली दाखवली.

शासन आपल्या दारी या उपक्रमावरून देवळाली मतदार संघात चांगलेच राजकारण पेटले आहे, आमदार सरोज आहिरे यांनी जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांना पत्र देत उपक्रम स्थगित करण्याची मागणी केली होती. खासदार गोडसे आणि आमदार अहिरे यांच्यातील राजकीय कुरघोडीची आज सकाळमध्ये वृत्तही प्रसिद्ध झाले होते, सहाजिकच या राजकीय वादामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाविषयी गिरणारे व परिसरात उत्सुकता होती पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे याकडे लक्ष लागून होते.

गिरणारे येथे सकाळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत वासंती माळी, प्रभारी तहसीलदार रचना पवार, नायब तहसीलदार डी. के. धांडे, नितीन पाटील, पुरवठा निरीक्षक अधिकारी भवरे, तालुका कृषी अधिकारी वाघ, सरपंच अलका दिवे, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले, तानाजी गायकर, सदानंद नवले, वामन खोसकर आदींसह विविध गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमाला पश्चिम भागातील चांदशी, गिरणारे, वडगाव, नाईकवाडी, लाडली, धोंडेगाव, इंदिरानगर, देवरगाव, ओझरखेड, नागलवाडी, गंगाम्हाळुंगी, दुगाव, मुंगसरा, दरी, मातोरी, जलालपूर, महादेवपूर या गावातील नागरिक सहभागी झाले. प्रत्येकी वेगवेगळ्या स्टॉलची रचना करण्यात आली होती. या स्टॉलमधून अर्जदारांना कृषी, पुरवठा, आरोग्य, संजय गांधी आदी योजनांच्या निगडित अर्जदारांकडून फॉर्म भरून घेण्यात आले. कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या अर्जदारांना लगेचच जागेवर दाखले देण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रेशन कार्ड, आधार कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्यांचा समावेश होता. जागेवर विविध दाखले मिळत असल्याने गिरणारे आणि पंचक्रोशीतील रहिवाशांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com