नाशिक : सत्तेत बसलेली भारतीय जनता पक्षाचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांबाबत एक धोरण म्हणून सतत खोटे आरोप करतात. खोट्या प्रकरणांत अडकवतात. त्यामुळे आपण देखील भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांवरील आरोपांविषयी फेरयाचिका दाखल कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिकचे जिल्हा अध्यक्षपुरुषोत्तम कडलग यांनी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय संघटनात्मक शिबिर महाबळेश्वर येथे झाले. यावेळी श्री. कडलग यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे ही मागणी केली.
ते म्हणाले, छगन भुजबळ यांच्यावर आरोप करून त्यांना २६ महिने तुरूंगात डांबण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखिल अशाच प्रकारे केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून अत्याचार होतो आहे. राज्यात भाजपची सत्ता असताना गावपातळीवर कोणी काहीही बोलले तरी मुख्यमंत्री कार्यालय त्याची दखल घेऊन संबंधीत पोलीस स्टेशनला चौकशी साठी बोलावले जायचे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने देखील एक समीती निर्माण करून संबंधीतांच्या भ्रष्टाचाराची फेरचौकशी केली जावी.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतुन झालेल्या युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांचे शिबिर २३ व २४ नोव्हेंबरला झाले. या शिबीरात राज्यातील विविध मंत्री, वक्त्यांनी भाग घेतले. शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, प्राध्यापक हरी नरके, नामदार जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विजय चोरमारे, प्रभाकर देशमुख, आमदार शशिकांत शिंदे, ॲड अनिकेत आव्हाड, जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्षाची ध्येयधोरणे खोलवर रुजवण्यात युवकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांचे खूप मोठे योगदान आहे, त्यातच आताच महाबळेश्वर येथे पार पडलेल्या दोन दिवसीय केडर कॅम्पमुळे युवकामध्ये एक नवी वैचारीक ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे. या कॅम्पमधील सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन युवकांना मोलाचे ठरले, तसेच वरिष्ठांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनोगत ऐकून घेतल्यामुळे कॅम्प मधील वातावरण खूपच खेळीमेळीचे आणि अभ्यासपूर्ण होते. या कॅम्पमुळे पुढील काळात पक्षाला नवी उभारी घेण्यास मदत मिळेल यात शंका नाही. "चेतना नव्या युगाची, नव्या विचारांची प्रगतीशील महाराष्ट्राची" हे ब्रीदवाक्य राष्ट्रवादीचे सर्व युवक खरे करणार हे नक्की, आणि याची प्रचिती नजीकच्या काळात निवडनुकांच्या माध्यमातुन सर्व युवकांकडून दिसेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी व्यक्त केला.
नाशिकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, गणेश गायधनी, सुनिल आहेर, सम्राट काकडे, अरुण आहिरे, दत्ता वाघचौरे, सोपान पवार, शाम हिरे, मोहन शेलार, जयराम शिंदे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार आदी सहभागी झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.