धक्कादायक... महापालिका निवडणुकीसाठी जनता दलाने मालेगावला दंगल घडवली?

माजी आमदार रशीद शेख यांनी विरोधकांवर आरोप केले
Rshid Shaikh
Rshid ShaikhSarkarnama

मालेगाव : २००१ च्या दंगलीनंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत जनता दलाला बहुमत मिळाले होते. कदाचित हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून समाजकंटक व तरुणांना फूस लावून शहरात हिंसाचार घडवून आणला असावा. फरार आरोपींना अटक केल्यास यातील सत्य बाहेर येईल, असा खळबळजनक दावा माजी आमदार रशीद शेख यांनी केला आहे.

Rshid Shaikh
डॅाक्टर वधूची कौमार्य चाचणी; रुपाली चाकणकरांनी अहवाल मागितला

श्री. शेख म्हणाले, शहरात गेली वीस वर्षे असलेली शांतता काही समाजकंटक व राजकीय पक्षांच्या डोळ्यात खूपत होती. पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी. फरार असलेल्यांना अटक करावी. सत्य बाहेर येईल. त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेला बंद शांततेत पार पडलेला असताना मोर्चा, निवेदन व तरुणांची माथी भडकविण्याचे काम पद्धतीशीरपणे करण्यात आले, असा जनता दलावर थेट आरोप माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.

Rshid Shaikh
गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन निर्धास्त कसे?, काय आहे कारण...

हजारखोली भागातील संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शहरातील हिंसाचारासंदर्भात त्यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की शहरातील दंगलीचा इतिहास व समाजकंटक कोण आहेत हे शहरवासियांना ठाऊक आहे. वारंवार इतिहासाची पुनर्रावृत्ती होणार नाही. शहर शांततेला गालबोट लावणारे व विकासाला बाधा निर्माण करणाऱ्यांना शहरवासियांनी ओळखले आहे. पोलिस प्रशासनाने अतिशय संयमी वृत्तीने व धीराने परिस्थिती हाताळल्याने समाजकंटकांचा डाव फोल ठरला आहे.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचाही संशयितांमध्ये समावेश आहे. या प्रश्‍नावर ते म्हणाले, कुसुंबा रोडने आलेल्या जमावात काही कार्यकर्ते होते. मात्र त्यांनी दगडफेक केली नाही. ते फक्त घोषणाबाजी करीत होते. बसस्थानकाजवळील जमलेला जमाव व नजीकच्या कम्पाऊंडमधील माथी भडकलेल्या तरुणांनीच दगडफेक, जाळपोळ केली आहे. सीसीटीव्ही चित्रीकरण, व्हिडिओ शुटींग यासह विविध ठिकाणी हे संशयित स्पष्टपणे दिसत आहेत. पोलिसांनी दोषींवर कठोर कारवाई करावी. निरपराधांवर कारवाई नको, असे ते म्हणाले.

श्री. शेख म्हणाले, की शहरात २००१ च्या दंगलीनंतर बॉम्ब स्फोट व काही आपत्तीजनक घटना घडल्या. मात्र, शहरवासियांनी शांततेची व राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना केली. त्रिपुरातील कथित घटनांच्या निषेधार्थ पुकारलेला बंद शंभर टक्के न भुतो न भविष्यती यशस्वी झाला. आपण सहा दशकात असा बंद पाहिला नव्हता. बंद सुरळीत पार पडला असताना मोर्चा व निवेदनाचा अट्टाहास करणाऱ्यांनी नाहक तरुणांना भरीस पाडले. नवीन बसस्थानक परिसरात झालेला हिंसाचार, समर्थनीय नव्हता. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच जाणीवपुर्वक हे षडयंत्र करण्यात आले. बंदला आपल्यासह सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला होता. मात्र, मोर्चा व अन्य घटनांमध्ये आमचा दुरान्वयेही संबंध नाही. बंदचे आवाहन करण्यामागे रझा अकॅडमीचा शुध्द हेतू होता. मात्र, राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीजण पुढे सरसावले. त्यातूनच हा प्रकार घडला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com