Vijaykumar Gavit News : विजयकुमार गावित यांच्यावर कारवाईऐवजी मंत्रिपदाचे बक्षीस?

Petitioner Gulab Patil`s Hunger strike for action against Minister Gavit-आदिवासी विकास विभागातील भ्रष्टाचार प्रकरणी न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालाप्रमाणे कारवाई करावी, यासाठी उपोषण करण्यात आले.
Hunger Strike of Gulab Pawar & Minister Vijaykumar Gavit
Hunger Strike of Gulab Pawar & Minister Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Trible Politics News : आदिवासी विकास विभागात २००४ ते २००९ या कालावधीत सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्याबाबत न्यायालयाने आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांसह विविध अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली होती. (Hunger strike at Sakri against Trible Devolopment Minister Vijaykumar Gavit)

या प्रकरणी आदिवासी विकास विभागाने (Trible) दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी याचिकाकर्ते गुलाब पवार यांनी साक्री प्रकल्प (Dhule) कार्यालयापुढे उपोषण केले. भारतीय जनता पक्षाचे (BJP) मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांच्यावर कारवाई केव्हा करणार अशी विचारणा त्यांनी केली.

Hunger Strike of Gulab Pawar & Minister Vijaykumar Gavit
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा समन्वयावर भर!

आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या विकासाच्या कल्याणकारी योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप पवार यांनी केला होता. आदिवासी विकास विभागातील या भ्रष्टाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड चौकशी समिती अहवालाप्रमाणे दोषींवर कारवाई करावी, तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ते उपोषणास बसले होते.

याचिकाकर्ते पवार यांचे उपोषण सहा दिवसांनंतर सोडविण्यात प्रशासनाला यश आले. त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने लेखी उत्तर प्रशासनाने दिल्यानंतर पवार यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, एकंदरच ज्यांच्यावर कारवाई करायला हवी, त्यांना राज्य सरकारने मंत्रिपदाचे बक्षीस दिले आहे. यावरून शासन गैरव्यवहारातील दोषींना पाठीशी घालत असल्याचा संदेश जात आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

आदिवासी विकास विभागात २००४ ते २००९ या कालावधीत कल्याणकारी योजनांमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची याचिका गुलाब पवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. यातील दोषींवर कारवाई करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

Hunger Strike of Gulab Pawar & Minister Vijaykumar Gavit
Maharashtra Politics : काँग्रेस म्हणते, `राज्यातील एकनाथ शिंदे सरकार शेतकरीविरोधी`

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना पदावरून हटवावे, दोषी डॉ. गावित, सनदी अधिकारी, प्रकल्प अधिकारी, संस्था, ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, भ्रष्टाचार झालेला निधी व्याजासह वसूल करावा, न्यायमूर्ती गायकवाड चौकशी समितीचा अहवाल व शिफारशीप्रमाणे अंमलबजावणी करावी, दोषी व गुन्हेगारांना मदत करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिपदावरून हटवावे व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी पवार यांनी उपोषण केले.

Hunger Strike of Gulab Pawar & Minister Vijaykumar Gavit
Uddhav Thackeray : शिर्डी जिंकण्यासाठी ठाकरेंनी 'फिल्डिंग' लावली; 'या' निष्ठावंतांवर मोठी जबाबदारी सोपवली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com