Uddhav Thackeray : शिर्डी जिंकण्यासाठी ठाकरेंनी 'फिल्डिंग' लावली; 'या' निष्ठावंतांवर मोठी जबाबदारी सोपवली

Loksabha Election : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली जात आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : पाच राज्यांच्या निवडणुका पार पडताच तेथील आलेले निकाल पाहता महाराष्ट्रात त्याचे पडसाद निश्चितच असणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यात मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत.

जिल्हाध्यक्षांपासून तालुकाध्यक्ष अशी बहुतांशी पदाधिकारी नव्याने नियुक्त केले असून, यात अनेक वर्षे बाजूला ठेवलेल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पुन्हा महत्वाची पदे दिली आहेत. लोकसभेला शिर्डी लोकसभा जिंकण्याची ही रणनीती असून, यात खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची मोठी भूमिका असल्याचे पुढे येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काही महिन्यांपूर्वीच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा ठाकरे शिवसेनेत पुनर्प्रवेश झाला. त्यांना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी पक्की समजली जात असून, त्यादृष्टीने त्यांनी मतदारसंघात कामाला सुरुवात केली आहे. या दरम्यान संगमनेर, कोपरगाव आदी तालुक्यातून वाकचौरे यांच्या विरोधात नाराजीचा सूर काही पदाधिकाऱ्यांनी अप्रत्यक्ष व्यक्त केला होता.

माजीमंत्री बबनराव घोलप यांनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा त्यात समावेश असल्याची चर्चा झाली. मात्र वाकचौरे यांनी मातोश्रीवर आपली 'फिल्डिंग' व्यवस्थित ठेवल्याचे दिसून आले. नुकतेच खासदार संजय राऊत यांच्याकडे नगर, नाशिक जिल्ह्याची लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांना मोठे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Uddhav Thackeray News
Ahmednagar News : कुणाची कशी जिरवायची, ते काम माझ्यावर सोडा..

तसेच नुकत्याच पाच राज्यात झालेल्या निवडणुकांत भाजपने सरशी केल्याचे दिसून आल्याने शिर्डी लोकसभेबाबत पक्षात चर्चा होऊन, उत्तर नगर जिल्ह्यातील संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय झाल्याचे पुढे येत असुन जिल्हाध्यक्ष पदी प्रमोद लबडे यांना हटवून रावसाहेब खेवरे यांना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी दिली आहे.

संगमनेर मधेही कैलास उर्फ आप्पा केसेकर यात जुन्या निष्ठावंत पण बाजूला ठेवलेल्या पदाधिकाऱ्यास तालुकाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे. हीच परस्थिती इतर तालुक्यात असल्याने ठाकरे शिवसेनेने जुन्या निष्ठवंतांना पुन्हा सोबत घेत शिर्डी लोकसभेचा गड ताब्यात ठेवण्यासाठी व्युव्हरचना केल्याचे बोलले जात आहे.

Uddhav Thackeray News
Prajakt Tanpure : 'हर घर जल' या योजनेविषयी तक्रारींचा पाढा; आमदार तनपुरेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

याबाबत नूतन जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी उद्धव ठाकरेंनी आपणावर विश्वास टाकला असून शिर्डी लोकसभा ठाकरे गट आपल्याच ताब्यात ठेवेल असा विश्वास सरकारनामाशी बोलताना व्यक्त केला आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हेच उमेदवार असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे एकनाथ शिंदे गटात गेले असल्याने आता शिवसेनेने भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डीतून उतरवण्याचे ठरवले आहे.

त्यादृष्टीने मध्यंतरी बबनराव घोलप यांच्या सहमतीने नेमलेले पदाधिकारी यांना बाजूला करत वाकचौरे यांच्या सोयीने नव्याने संघटनात्मक बदल मातोश्रीवरून झालेले दिसत आहेत. पक्षाचे मुखपत्र दैनिक सामनातून पदाधिकार्‍यांच्या नावाची घोषणा करतांना पक्षाने संगमनेरसह अकोले, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा या उत्तरेतील सर्व तालुक्यात खांदेपालट घडवून आणले आहे.

असे आहेत प्रमुख फेरबदल -

जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, प्रचारप्रमुख सुहास वहाडणे (संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी), सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), अ‍ॅड.दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता), जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा) आदींची निवड करण्यात आली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com