Girish Mahajan News; आयुष्यभर मी चहाला शिवलोही नाही!

`फिट` मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले त्यांच्या निरोगी आयुष्याचे रहस्य
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

जळगाव : (Jalgaon) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan_ त्यांच्या फिटनेसविषयी अतिशय जागरूक असतात. आपल्या व्यस्त दिनक्रमात देखील ते शारीरीक तंदुरूस्तीसाठी वेळ काढतात. त्यामुळे ते फिट मंत्री (Minister) म्हणून चर्चेत आहेत. त्यांनी आता नागिरकांना (Citizen) जागरूक राहून स्थूलपणा (Obecity) टाळा असा सल्ला दिला आहे. (Womens are facing obesity issue more then mensin society)

Girish Mahajan
Nandurbar News; आम्ही पण महाराष्ट्रातच राहतो ना?

स्थूलपणा घालविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केलेले अभियान राज्यभरात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. यासंदर्भात त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे कार्यक्रम झाला.

यावेळी मंत्री महाजन यांनी निरोगी जीवनाचे रहस्य सांगितले. आयुष्यभर मी चहाला शिवलोही नाही. तेलकट-तुपकट पदार्थ, फास्ट फूड, साखर मी टाळतो. पूर्णपणे निर्व्यसनी आहे. दररोज सकाळी एक तास व्यायाम करीत असून, जिममध्ये जातो.

Girish Mahajan
Sharad Pawar News : पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत!

व्यायाम व आहार यावर आपले वजन अवलंबून आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये स्थूलपणा दुप्पटीने वाढला आहे. स्थूलपणामुळे विविध आजार जडतात. लहान मुलांना स्थूलपणा होणार नाही, याबाबत मुलांना माहिती दिली व काळजी घेतली, तर भविष्यात मुलांमध्ये स्थूलता वाढणार नाही.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानास शनिवारी (ता. ४) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) प्रारंभ झाला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील मंचावर होते.

Girish Mahajan
Nashik News; महिंद्रा इलेक्ट्रिकल प्रकल्पावरून भाजपसह शिंदे गटाची होणार कोंडी

मंत्री महाजन म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली बदलली आहे. पूर्वी गादीवर झोपणारे आता खाली पट्टी टाकून झोपताहेत. पंचपक्वान्न खाणारे आता पालेभाज्या उकडून, कच्च्या खाताहेत. अस्वास्थ्य खाण्यामुळे शरीरात चरबी वाढत आहे. विद्यार्थ्यांचे वजन करून, तसेच स्थूल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना निरोगी शरीर ठेवण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे ध्येय विभागाचे आहे.

अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी प्रस्ताविकेत वैद्यकीय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या विविध अभियानात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

Girish Mahajan
Nashik News; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काँग्रेस नेत्यांचे थेट आव्हान!

उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण शेकोकार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, स्थूलपणा जनजागृती व उपचार अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. आशिष चव्हाण, विविध विभागप्रमुख, अधिकारी, अधिसेविका, डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संगीता गावित यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com