Sharad Pawar News : शरद पवारांना मोठा धक्का; 'या' निवडणुकीत पॅनेलचा पराभव

Maharashtra Political News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावली.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अजित पवारांनी बंड केल्यानंतर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली गेली आहे. यानंतर अजितदादांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, घड्याळ चिन्हावर दावा ठोकला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पुन्हा पक्षबांधणीवर भर देतानाच महाराष्ट्र पिंजून काढत आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, पवारांना धक्का देणारा निकाल समोर आला आहे.

मुंबईतील गरवारे क्लब निवडणुकीत शरद पवारांच्या(Sharad Pawar) पूर्ण पॅनेलचा पराभव झाला आहे. याचवेळी गरवारे क्लबच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील 'बडा' क्लब म्हणून ओळख तसेच कोट्यवधींचा वार्षिक 'टर्न ओव्हर' असलेल्या या निवडणुकीतील पराभव पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर याच निवडणुकीत भाजपच्या माजी आमदाराचाही पराभव झाला आहे.

Sharad Pawar News
Nashik Onion Issue: कांद्याच्या प्रश्नात दोन्ही पवारांची उडी; अजितदादांची बैठक तर शरद पवारांची 'ही' मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅनेलचे गरवारे क्लबवर सुमारे 30 वर्षे एकहाती सत्ता होती. पण या वर्षीच्या निवडणुकीत पवारांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, आता पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला असल्याची चर्चा आहे. क्लबच्या उपाध्यक्षपदासाठी पवारांच्या पॅनेलमधून भाजपचे माजी आमदार राज पुरोहित हेही रिंगणात होते. मात्र, त्यांनाही धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

गरवारे क्लबच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे 13 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने मतदान करण्यात आले. या निवडणुकीच्या मतमोजणीत शरद पवारांचा विजय झाला. पण त्यांच्या डेव्हलपमेंट ग्रुप पॅनेलचा पराभव झाला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. पवारांच्या डेव्हलपमेंट ग्रुप विरुद्ध जीसीएच डायनॅमिक ग्रुप या दोन पॅनेलमध्ये लढत झाली. यात जीसीएच डायनॅमिक ग्रुपने पवारांच्या पॅनेलचा पराभव केला.

मोदींच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर...

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय विरोधी पक्षांकडे पर्याय नव्हता. विरोधकांनी या विधेयकाला नाईलाजाने पाठिंबा दिला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) विरोधकांवर सोमवारी केली होती. मोदींच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sharad Pawar News
Mantralaya News : मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न अन् लाच देण्याच्या घटनांवर सरकारचा जालीम उपाय

महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले, तर कोणीही विरोध केला नाही. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, ही मोदींची टीका चुकीची आहे. महिला आरक्षणावर आधीदेखील विचार झालेला आहे, असा हल्लाबोल पवारांनी पंतप्रधान मोदींवर केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Sharad Pawar News
Sharad Pawar On PM Modi: मोदींची टीका चुकीची; सर्वात आधी आरक्षण...; शरद पवारांनी थेट इतिहासच सांगितला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com