Maratha Reservation : पंतप्रधान मोदी विशेष अधिवेशनात आरक्षण का देत नाहीत?

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला लगेचच आरक्षण का देत नाहीत, यावर राज्य सरकार गप्प का?
Hemant Godse & Vijay Karanjkar
Hemant Godse & Vijay KaranjkarSarkarnama
Published on
Updated on

Maratha Andolan : निवडणूक आयोगाचे प्रमुख बदलण्यासाठी पंतप्रधान कायदा बदलू शकतात. महिला आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेऊ शकतात, मग मराठा समाजासाठी आरक्षणाची महाराष्ट्रातील आरक्षण मर्यादा ५१ वरून ६१ करण्यासाठी विशेष अधिवेशन का बोलवत नाही. त्यांनी तसे केले तर ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयदेखील बदलू शकणार नाही. (Shivsena District head Vijay karanjkar criticized Hemant Godse on Resign)

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा समाचार घेतानाच, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) विशेष अधिवेशन का घेत नाही? असा प्रश्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Hemant Godse & Vijay Karanjkar
Maratha Reservation News : राजीनाम्याचे नाटक हेमंत गोडसेंच्या अंगलट

करंजकर यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतलेला नाही, याविषयी नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षण अत्यंत गंभीर वळणावर गेले आहे.

राज्य सरकार व सत्ताधारी पक्ष अद्यापही हा प्रश्न गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात. सरकारने लवकर शहाणे होऊन कामकाजातील अजगराची सुस्ती सोडावी आणि गतीने काम करावे, अशी टीकादेखील केली.

ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजप हाच पक्ष सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना वगळण्यासाठी स्वतंत्र विधेयक संसदेत आणले.

कोणतीही कार्यक्रम पत्रिका न देता पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. मग ते याचप्रमाणे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्रातील आरक्षणाची मर्यादा ५१ टक्के ऐवजी ६१ टक्के करून मराठा समाजाला आरक्षण का देत नाहीत?. राज्य शासन हा सोपा मार्ग का स्वीकारीत नाही, त्यांना मराठा समाजातील गरीब, बेरोजगार, संकटग्रस्त युवकांची दया येत नाही का?.

Hemant Godse & Vijay Karanjkar
मराठा बांधवांकडून कोल्हेंच्या राजीनाम्याची मागणी | Amol Kolhe On Maratha Reservation

राजीनामा कुठे पाठवायचा याची माहिती नाही

पत्रक बहाद्दर खासदार गोडसे यांना संसदेचे काम, अधिकार याबाबत दहा वर्षात काहीच कसे शिकता आले नाही. त्यांनी विशेष अधिवेशनाची मागणी का केली नाही. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा कसा पाठवला, हा मतदारसंघातील मराठा बांधवांच्या मनातील प्रश्न आहे.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. अनवधानाने किंवा अज्ञानातून आपल्या साध्याभोळ्या खासदाराला राजीनामा कुठे पाठवायचा, याची माहिती नसावी. त्यांना मी सर्व ई-मेल आयडी देतो.

लोकसभेच्या अध्यक्षांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला तरी तो मंजूर होतो. त्यासाठी मी त्यांना ई-मेल, पत्ता, फोन क्रमांक, लोकसभेचे अध्यक्ष कोणीही सर्व माहिती देण्यास तयार आहे. त्यांनी माझ्याशी संपर्क करावा, असा चिमटादेखील त्यांनी घेतला.

Hemant Godse & Vijay Karanjkar
Chandrakant Patil Security : चंद्रकांतदादांच्या घराला छावणीचे रूप; सुरक्षेसाठी तब्बल १०० पोलिस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com