PM Modi Visit Nashik
PM Modi Visit NashikSarkarnama

PM Modi Visit : भुजबळांसह अजित पवार गट मोदींच्या कार्यक्रमापासून दोन हात दूर? वेगवेगळ्या चर्चा सुरू

PM Modi To Inaugurate National Youth Festival : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नाशिकमध्ये येत आहेत...
Published on

अरविंद जाधव -

PM Modi Nashik Visit News :

राष्ट्रीय युवा अभियानाच्या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीचा कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेनेचे (शिंदे गट) वरिष्ठ नेते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अत्यंत कमी वेळेत या सोहळ्याचे आयोजन होत असल्याने वरिष्ठ नेते दिवस-रात्र काम करतानाचे चित्र समोर येते आहे.

नाशिकमध्ये उद्या भव्यदिव्य सोहळा होत असताना मंत्री Chhagan Bhujbal यांची अनुपस्थिती मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. कार्यक्रमाच्या आयोजनात ते एकदाही समोर आलेले नाहीत. किंबहुना अजित पवार गटच या सोहळ्यापासून अद्याप दूर राहिल्याचे दिसते.

PM Modi Visit Nashik
PM Narendra Modi Nashik Visit : '...तर मोदींच्या दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल'

राष्ट्रीय युवा अभियानात देशभरातील लाखो युवक हजेरी लावणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यातून राजकीय मायलेज घेतले जाईल, यात शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक नाशिक दौरा केला. अगदी तीन तास फिरून त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेतली.

मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे जवळपास आठ दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन अगदीच कमी वेळेत होत असल्याने प्रशासनावर मोठा दबाव आहे. वास्तविक नाशिकमध्ये अशा मोठ्या आयोजनात कायमच पुढाकार घेणारे मंत्री छगन भुजबळ मात्र यावेळी बॅकफूटवर आहेत. आतापर्यंत ते कार्यक्रमाच्या आयोजनापासून दोन हात दूर राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा कार्यक्रम सर्वांचा असल्याचे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी वेळोवेळी दिले असले तरी भुजबळांची अनुपस्थिती सर्वांनाच खटकणारी आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांच्या मते राज्यातील विविध दौरे, राष्ट्रवादीचा संवाद मेळावा आणि आज नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा अशा नियोजित कार्यक्रमांमुळे भुजबळ व्यग्र आहेत.

दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी या वादाचे पडसाद कार्यक्रमावर पडायला नको, अशी काळजी आयोजकांकडून घेतली जात असल्याचा दावा करण्यात येतोय. याबाबत मंत्री भुजबळांनी अद्याप काहीही मत व्यक्त केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारीला शहरात दाखल होतील. त्यांचा जाहीर कार्यक्रमसुद्धा पार पडेल. यावेळी तरी भुजबळ हजर असतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

edited by sachin fulpagare

R...

PM Modi Visit Nashik
Lok Sabha Election 2024 : ठाकरे गटाची स्ट्रॅटेजी! काळारामच्या साक्षीने नाशिकमधून फुंकणार रणशिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com