अरविंद जाधव-
Nashik : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याआधी पोलिसांकडून घबरदारी म्हणून शेतकरी नेत्यांना नोटिसा दिल्या आहेत. नेत्यांच्या हालचालींवर पोलिसांकडे लक्ष्य ठेवले जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली भूमिका जाहीर केली आहे.
कांदा निर्यातबंदी लादून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक संकटांत टाकले. आता पोलिस प्रशासन शेतकरीनेत्यांना नोटिसा देऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. कांदा निर्यातबंदीमागे जिल्ह्यातील सर्व शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतास येऊ. तसे झाले नाही तर उद्या मोठे आंदोलन उभारण्यात येईल. यातून कायदा व सुव्यवसथेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा सज्जड दमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
राष्ट्रीय युवा अभियानाचे आयोजन शहरात होत असून शुक्रवारी (ता. 12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्याला विविध शेतकरी संघटनांकडून विरोध दर्शवला जातो आहे.
याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी सांगितले की, शेतकरीहिताचे निर्णय कोठे आहेत. कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अशी आमची मागणी आहे. मात्र महिना उलटून गेला तरी केंद्र सरकारने निर्णय जाहीर केलेला नाही. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांच्या मनात राग असताना पोलिस मात्र शेतकरी संघटनेच्या नेत्यांना नोटिसा पाठवून दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकरीनेत्यांची धरपकड केली जाते आहे. पोलिसांची मोठी शक्ती शेतकरीनेत्यांमागे घालवत आहेत. वास्तविक केंद्र सरकारने तत्काळ कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कांदा निर्यातीचा निर्णय मागे घेतला तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील सर्वच शेतकरी मोदींच्या स्वागताला उभे राहतील. मात्र, तसे झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जगताप यांनी दिला. हे आंदोलनसुद्धा मोठेच असेल. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशाराही जगताप यांनी दिला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.