Vikhe Patil News: मंत्री विखेंच्या प्रश्नावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लपवली तोंडे !

PM Modi Shirdi Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जशी तारीख जवळ येत आहे, तशी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची धावपळ वाढत आहे. श्रीरामपूरपाठोपाठ नेवासे येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत, 'नेवाशातील प्रत्येक तक्रारीवर मी काम करतो, पण पक्ष संघटनेच्या कामावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते कुठे जातात, हेच कळत नाही. पक्षाचे काम कोण करणार ?, असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना केला. या वेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या मागे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त नेवासे येथे मंत्री विखे यांनी नियोजनाची आढावा बैठक घेतली. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, महंत विष्णुदास महाराज, भगवान गंगावणे, भाऊसाहेब फुलारी, ज्ञानेश्वर पेचे, अंकुश काळे यांच्यासह भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
PM Modi Shirdi Visit: मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनात निरुत्साह; मंत्री विखेंनी भर बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांना झापले

"मी जे बोलतो, ते करून दाखवतो. नेवाशात जेव्हा आलो, तेव्हा माझ्यासमोर तक्रारीच आल्या. त्यावर मी काम केले. काहींनी काम करून घेतले, पण आता पक्षाचे काम करायचे आहे. ते कोण करणार ?" पक्षाची ताकद वाढवण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. नेवाशात माफियाराज आहे. ते संपविण्याची आपली भूमिका असणार आहे, असेही मंत्री विखे यांनी सांगितले.

"एमआयडीसीत दुसरेच उद्योग..."

बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत का ? असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विचारल्यावर चांगलीच कुजबूज रंगली. नेवाशाच्या पांढरीपूल येथील एमआयडीसीची प्रगती व्हायला पाहिजे. मात्र, तिथे दुसरेच उद्योग सुरू झाले आहेत. त्याचा लवकरच आपण बंदोबस्त करणार असून, विकासात्मक कामाला चालना देणार आहे, असे मंत्री विखे यांनी सांगितले.

Edited by Ganesh Thombare

Radhakrishna Vikhe Patil
Drug Case : ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या; बाळासाहेब थोरात आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com