Modi In Nashik : मोदींचा नाशिक दौरा; अजित नवलेंसह अनेक नेत्यांना पोलिसांनी केले स्थानबद्ध

Nashik News: शंभरहून अधिक लोक स्थानबद्ध
Modi In Nashik
Modi In NashikSarkarnama

Narendra Modi Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येणार असल्याने विविध संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी स्थानबद्ध केले आहे. त्यावर या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नाशिक जिल्ह्यात मराठा आरक्षण, कांदा निर्यातबंदी, कामगारांचे प्रश्न यावर अतिशय नाराजीचे वातावरण आहे. यातील काही संघटनांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान निषेध करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या पोलिस यंत्रणांनी कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. शंभरहून अधिक लोकांना स्थानबद्ध केले आहे. यामध्ये काही महत्त्वाचे नेतेदेखील आहेत. त्यांच्या नेत्यांनी निषेध केला आहे.

सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते डॉ. डी. एल. कराड यांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. आज सकाळीच नाशिक शहर पोलिसांनी काही नेत्यांना स्थानबद्ध केले आहे. मोदी सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध निदर्शने आंदोलन करू नये, यासाठी आंदोलन करण्याच्या अधिकारावर राज्य सरकारने हा हल्ला केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मोदी सरकारच्या धोरणामुळे त्रस्त झालेला शेतकरी, कामगारवर्ग, आशा व अंगणवाडी कर्मचारी, पेन्शनर्स यांच्या प्रश्नांबाबत निदर्शने करण्याची योजना होती. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार त्यांची मुस्कटदाबी करीत आहे," असा आरोप डॉ. कराड यांनी केला. ते म्हणाले, "मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभारामुळे देश त्रस्त आहे. मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारच्या कृत्याचा भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व सीटू संघटना तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. अशा हल्ल्यांना शेतकरी, कामगार व जनता घाबरणार नाही," केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्याविरोधात भूमिका घेतल्यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांना रात्रभर घरातच स्थानबद्ध केले आहे. काल (ता. 11 जानेवारी) रात्री 12 वाजता डॉ. अजित नवले यांना अकोले पोलिसांनी नोटीस बजावली. तसेच रात्रभर त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध केले, अशी माहिती नवले यांनी दिली आहे.

R...

Modi In Nashik
Nilesh Lanke: लंकेचं ठरेना; महायुती की महाविकास आघाडी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com