Raksha Khadse : शरद पवारांच्या 'त्या' फॅक्टरमुळे रक्षा खडसेंच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ?

Raksha Khadse Oath Cermony : पंतप्रधान कार्यालयातून सकाळी रावेर मतदारसंघातून हॅटट्रिक केलेल्या रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची गोड बातमी मिळाली.
Raksha Khadse | Sharad Pawar
Raksha Khadse | Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Cabinet Ministers : मावळत्या लोकसभेतील तीन प्रमुख भाजपचे उमेदवार यंदा मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, हे सर्व शरद पवार यांच्या महाविकास आघाडीच्या 'फॅक्टर'ने पराभूत झाले. त्यामुळे रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

पंतप्रधान कार्यालयातून सकाळी रावेर मतदारसंघातून हॅटट्रिक केलेल्या रक्षा खडसे ( Raksha Khadse ) यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची गोड बातमी मिळाली. या बातमीने त्यांना आनंदाश्रू आले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपतील राजकीय कारकीर्द तसेच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची केलेली घोषणा या 'फॅक्टर'मुळे रक्षा खडसे यांना ही संधी उपलब्ध झाली.

मावळत्या लोकसभेत उत्तर महाराष्ट्रातील सर्व आठ जागांवर भाजप-शिवसेना युतीचे खासदार होते. यामध्ये नंदुरबारच्या डॉ. हिना गावित, दक्षिण नगरचे डॉ. सुजय विखे-पाटील आणि दिंडोरीच्या विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार हे प्रमुख होते. हे तिघेही मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांनी खेळी करून दिलेल्या अचूक उमेदवारांमुळे भारतीय जनता पक्षाचे सहापैकी चार खासदार पराभूत झाले.

Raksha Khadse | Sharad Pawar
India PM Oath Taking: PMO मधून फोन आला अन् रक्षाताईंना रडू कोसळलं; नाथाभाऊ कुटुंबासह विमानाने दिल्लीला रवाना..

भाजप रावेर आणि जळगाव या दोन मतदारसंघापुरतं मर्यादित झाला. यामध्ये स्मिता वाघ (जळगाव) या नवख्या खासदार आहेत. रावेरमधून रक्षा खडसे यांनी हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ म्हणून त्यांना मंत्रिपदाची संधी आयतीच मिळाली आहे.

खासदार रक्षा खडसे मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. नवी दिल्लीतील या शपथविधीला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत. या निर्णयामुळे खडसे यांच्या मागे गेली काही वर्षे सुरू असलेले राजकीय अडचणींचा आणि खटल्यांचा ससेमिरा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू होऊ शकेल. त्यात खडसे हे महत्त्वाची जागा घेतील.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com