
Deepak Pande & MLA Nitin Pawar
Sarkarnama
रवींद्र पगार
कळवण : आदिवासींचे ग्रामदैवत डोंगऱ्यादेव उत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी काठरे दिगर येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट दिली. रात्रभर पारंपारीक आदिवासी नृत्य करत जागरणाच्या या उत्सवात आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) आणि दिपक पांडे (Deepak Pande) यांनी आदिवासींसोबत ठेका धरत नृत्य केल्याने आदिवासींनी त्यांना मोठी दाद दिली.
भारतीय लोकजीवनात कामना सिद्धीची व्रते भरपूर आहेत. परंतु भारतीय लोक जीवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी जमातीमध्ये अशी काही व्रते आहेत की, ती आचरणात करण्यास अतिशय अवघड आहेत. मात्र तरीसुद्धा पूर्वजांची परंपरा सतत पुढे चालत रहावी, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी सुद्धा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आदिवासींच्या काही व्रतांपैकी एक व्रत म्हणजे " डोंगऱ्यादेव " हे आहे. डोंगऱ्यादेव हा उत्सव तालुक्यातील कोकणा - कोकणी, भिल्ल, महादेव कोळी हे समाज संपूर्ण गाव एकत्रित रित्या प्रत्येक गावाच्या प्रथेनुसार तीन किंवा पाच वर्षांनी साजरा करतात. हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला सुरु होऊन मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. काल दि १४ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता नाशिकचे पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी काठरे दिगर गावातील डोंगऱ्यादेव उत्सवाच्या ठीकाणी भेट दिली.
आदिवासी बांधव निसर्गाप्रती जपत असलेल्या आदिवासी संस्कृतीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आदिवासी बांधवानी पावरी नृत्य करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. पोलीस आयुक्त दिपक पांडे व आमदार नितीन पवार यांनीही पावरीच्या तालावर माऊली, ग्रामस्थांसोबत ठेका धरला. आयुक्त श्री पांडे यांचा सत्कार सरपंच विजय गांगुर्डे यांनी पावरी वाद्य देऊन केला. यावेळी श्री पांडे यांना पावरी वाद्य वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. श्री पांडे व आमदार नितीन पवार यांनी सर्व ग्रामस्थांसमोर पावरी वाजविण्याचा देखील प्रत्यत्न केला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्रीताई पवार, पंचायत समिती सदस्य लालाजी जाधव, रघुनाथ महाजन, पोलीस पाटील राजाराम महाजन, एकनाथ जगताप, डी एम गायकवाड, राजू पाटील, अनिल घोडेस्वार , कैलास बहिरम ग्रामसेवक कपिल बिन्नर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.