सातपूर : अंबड (Nashik) येथील उद्योजकाचा खून झाल्याने औद्योगिक क्षेत्रात त्याची प्रतिक्रीया उमटली. भाजपच्या (BJP) उद्योग आघाडीच्या नेत्याला ही पेटवापेटवीची संधी वाटली. मात्र पोलिस आयुक्त (Police) जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी यातील एकाही संशयीतांवर यापूर्वी एकही गुन्हा नाही. व्यक्तीगत कारणातून या घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे उद्योजकांनी आंदोलनाचा विषय सोडला. (Industrialists canceled agitation aganist police Department)
दोन दिवसांपूर्वी अंबड येथे कंपनीच्या गेटवर उद्योजकाचा खून झाला. त्यामुळे शहरातील उद्योजक संतप्त होते. या संदर्भात आयमा येथे उद्योजकांची एक बैठक झाली. ही संधी साधून भाजपच्या उद्योग आघाडीच्या एका नेत्याने बैठकीत आपण स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडे एक हजार शश्त्र परवाने मागू, आंदोलन करू, उद्यापासून काळ्या फिती लावून काम करू, अशी चिथावणी दिली. बहुतांश उद्योजकांची तशी मानसिकता देखील झाली. (Nashik Latest Marathi News)
त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी यातील एकाही संशयीतांवर यापूर्वी एकही गुन्हा नाही. उद्योजकाची हत्या झाली, त्यात व्यक्तीगत कारण देखील आहे. यापूर्वीच्या आठ खुनांच्या घटनेतही जवळपास तशीच पार्श्वभूमी आहे. यातील एकही आरोपी सराईत नाही. व्यक्तीगत कारणातून या घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले. आम्ही याबाबत अतिशय दक्ष आहोत. विविध उपाय करीत आहोत, असे सांगत सर्व घटनांची पार्श्वभूमी कथन केली. उद्योजकाच्या हत्येतील संशयीतास एक तासात पकडण्यात आले आहे. त्यांच्या माहिती नंतर उद्योजकांनी आंदोलनाचा विषय सोडला. भाजप नेत्याचा जो डाव होता तो हवेतच विरला.
उद्योजक नंदकुमार आहेर यांच्या खुनाचा उद्योजक, व्यापारी संघटनांनी ‘आयमा’ सभागृहात आयोजित बैठकीत तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे, यासाठी सह्यांची मोहीम राबविणे. या भागासाठी मंजूर असलेले पोलिस स्टेशन औद्योगिक वसाहतीतच एमआयडीसी पोलिस स्टेशन नावाने उभारावे, बंद पोलिस चौकी पुन्हा सुरू करावी, अतिरिक्त दोन पोलिस चौक्या चालू करणे, औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक, अंबड लगतच्या विशिष्ट भागात पेट्रोलिंग वाढवणे व बीट मार्शल वाढवणे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना उद्योजकांच्या भावनांची तीव्र दखल घ्यावी लागली आणि त्यांनाही आयोजित बैठकीस हजेरी लावून उद्योजकांच्या भावना जाणून घेतल्या. बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले.
व्यासपीठावर आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, आयमा बीओटी चेअरमन धनंजय बेळे, चेंबरचे संजय सोनवणे, भाजपचे एमेसएमई सदस्य प्रदीप पेशकार, नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य, लघुउद्योग भारतीचे सचिव निखिल तापडिया, निवेकचे माजी अध्यक्ष संदीप सोनार, उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, सीसीआय माजी अध्यक्ष सुधीर मुतालिक, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, डी. जी. जोशी, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे आदी उपस्थित होते.
बैठक सुरू असतानाच पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख तेथे आले असता, निखिल पांचाळ आणि धनंजय बेळे यांनी उद्योजक प्रचंड दहशतीखाली असून त्यांनी त्यांनी बैठकीत तीव्र संताप व्यक्त केल्याचे निदर्शनास आणून दिले. पोलिस आयुक्तांनी बहुतांश मागण्या तत्त्वतः मान्य केल्या. औद्योगिक तंटे सोडविण्यासाठी एसीपी सोहेल शेख यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविणार. सातपूर आणि अंबडचे विभाजन करून नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. या ठाण्याला औद्योगिक वसाहत असे नाव देण्याचा प्रयत्न करू, बंद पोलिस चौकी पुन्हा तातडीने सुरू करू, टवाळखोरांचा चोख बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन नाईकनवरे यांनी उद्योजकांना दिले.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.