NDCC News : राष्ट्रवादीच्या थकबाकीदार नेत्यांना पोलिस देताहेत संरक्षण!

Police provide protection to NCP`s Bank defaulter leader-जिल्हा बँकेकडून नियमबाह्य कर्जप्रकरणी सोसायटीच्या संचालकांविरोधात...
NDCC Bank
NDCC BankSarkarnama
Published on
Updated on

NDCC Bank news : सदोष कर्जवाटप आणि थकबाकीमुळे जिल्हा बँक अडचणीत आहे. वसुलीसाठी सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव केले जात आहेत. दुसरीकडे मात्र मोठ्या थकबाकीदारांवर कारवाईत पोलिसच अडथळे बनत आहेत. या नेत्यांवर कारवाई करण्यास पोलिस कचरत असल्याचे चित्र आहे. (Nashik district Bank is in financial crisis due to unrecover loans)

नाशिक (Nashik) जिल्हा बँकेवर (Cooperative) सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत कर्जवसुलीसाठी सातत्याने पाठपुरावा होत असूनही प्रतिसाद नाही. याबाबत सदोष कर्जवाटप करणाऱ्या नेत्यांची तक्रार करूनही पोलिस (Police) मात्र त्यांना संरक्षण देत असल्याचे चित्र आहे.

NDCC Bank
Nandurbar Political News: धनगर आरक्षणावरून बिरसा फायटर्सने बावनकुळेंना खडसावले!

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा एनपीए वाढल्याने लायसन्स धोक्यात सापडल्यानंतर बॅंकेकडून वसुलीबाबत अॅक्शन प्लॅन बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच बँक प्रशासनाने वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नियमबाह्य कर्जवाटप केलेल्या दिंडोरी तालुक्यातील जऊळके (वणी), खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल) या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालकांविरोधात पोलिस तक्रार करूनही गुन्हा दाखल केला जात नसल्याने बँकेने आता न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

यासंदर्भात बॅंकेतर्फे दिंडोरी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वसुलीची कार्यवाही प्रभावी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेने नियमबाह्य कर्जवाटप केले. हे कर्जवाटप वसूल न झाल्याने बँक आर्थिक अडचणीत सापडली.

बँकेच्या खेडगाव बृहत् व खेडगाव (स्मॉल), जऊळके शाखेत फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला होता. या तिन्ही सोसायट्यांच्या सभासदांना मंजूर झालेले पीक कर्ज संचालक मंडळातील संचालकांनी स्वतःचे व नातेवाइकांचे नावाने वाटप केले.

NDCC Bank
Dipika Chavan News : दीपिका चव्हाण यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा!

सोसायटीच्या इतर सभासदांना कर्ज रक्कम मिळालीच नाही. नियमबाह्य कर्जवाटप झाल्याचे उघड झाले होते. या बड्या थकबाकीदारांनी थकबाकी न भरल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यात बहुतांश सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्याचे बोलले जाते. मात्र, पोलिस त्यांच्यावर कारवाई करीत नाही.

NDCC Bank
BJP-NCP Politics : भाजपने स्थगिती उठवली...राष्ट्रवादीने पुन्हा आणली स्थगिती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com