शिंदे- ठाकरे वाद; नाशिक पोलिस जरा जास्तच सक्रीय झाले!

पोलिसांकडून झालेल्या कारवाईने सत्तेला झुकते माप दिल्याचा आरोप
Sudhakar Badgujar & Pravin Tidme
Sudhakar Badgujar & Pravin TidmeSarkarnama

नाशिक: बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (Eknath Shinde) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांनी म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या (Municiple Employee sena) कार्यालयाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackrey) शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी बळजबरीने ताबा घेतल्याचा आरोप करत सरकारवाडा पोलिसांकडे (Nashik Police) तक्रार केली. (Shinde Group and Uddhav Thackrey Shivsena politics in Nashik)

Sudhakar Badgujar & Pravin Tidme
Shivsena : शिवसेनेला मोठा धक्का ; अडीच लाख प्रतिज्ञापत्रांना केराची टोपली

त्या अनुषंगाने पोलिसांनी बडगुजर व तिदमे या दोघांनाही नोटीस बजावत संघटनेचे कार्यालय सील केले आहे. कार्यालयाच्या दारावर नोटीस बजावताना पोलिसांनी न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन केले.

Sudhakar Badgujar & Pravin Tidme
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

नाशिक म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्ष पदावरून गेल्या महिन्याभरापासून वाद सुरू आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेल्या तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बबन घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याकडे सूत्रे सोपविली. बडगुजर यांनी मागील आठवड्यात महापालिका मुख्यालयात संघटनेच्या अध्यक्षपदाचे सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तिदमे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेतल्याची तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी बडगुजर यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी बडगुजर व तिदमे या दोघांनाही नोटीस बजावत संघटनेचे कार्यालय २४ ऑक्टोबरला सील केले. संघटनेच्या अध्यक्षपद, तसेच कार्यालयासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

३१ ऑक्टोबरला कागदपत्रे सादर करणार

म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे कार्यालय सील केल्यानंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख व संघटनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी पोलिस कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला. सर्वसाधारण सभेत बहुमताने संघटनेचे अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या ठराव इतिवृत्त व इतिवृत्त नोंदवहीची सत्यप्रत आपण महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त तसेच औद्योगिक न्यायालय व कामगार उपायुक्त कार्यालयात सादर केली.

संघटनेचे कार्यालय तिदमे यांच्या मालकीचे नाही. कार्यालयाच्या कामकाजासाठी रवी येडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालय फोडून आपण बेकायदेशीर प्रवेश केला हा आरोप खोटा आहे. तिदमे यांचा संघटनेच्या अध्यक्ष पदाशी कुठलाही संबंध राहिलेला नाही. पोलिसांकडून होत असलेली कारवाई एकतर्फी आहे. राज्य शासनाकडून कदाचित पोलिसांवर दबाव आणला जात असावा. ३१ ऑक्टोबरला वस्तुस्थिती दर्शक कागदपत्रे सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सादर करणार असल्याचे श्री. बडगुजर यांनी सांगितले.

संघटनेच्या सभासदांच्या सर्वसाधारण सभेत आपली एकमताने अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे. त्यानंतर प्रवीण तिदमे यांचा संघटनेशी संबंध राहिलेला नाही. तिदमे यांनी पोलिसांची दिशाभूल केली आहे.

- सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com