Shivsena : शिवसेनेला मोठा धक्का ; अडीच लाख प्रतिज्ञापत्रांना केराची टोपली

Shivsena : शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत.
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांच्या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.

शिवसेना कुणाची हा वाद आता न्यायालयात गेला आहे. ठाकरे गट, शिंदे गटाने शिवसेना आमचीच, असा दावा केला आहे. दोन्ही गटांनी न्यायालयात पुराव्यासाठी विविध कागदपत्रे सादर केली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांमार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्र जमा केली होती. मात्र, ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी ठरली असली तरी देखील 8.5 लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश आलं आहे. ही प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये ही प्रतिज्ञापत्र नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ही कागदपत्र आता जमा करुन देखील निरोपयोगी ठरल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Ramdas Kadam : अजितदादांनी राजीनामा द्यावा, ठाकरेंनी विरोधीपक्षनेता व्हावे, असे रामदास कदम का म्हणाले..

खरी शिवसेना कुणाची याचा निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही गटांना आता वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. ठाकरेंना निवडणूक आयोगाने धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com