Maratha: बकालेंच्या अटकेसाठी पथक ठाण्यात मुक्कामी

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्ह्यातील प्रमुख पुरावा गायब
Kirankumar Bakale
Kirankumar BakaleSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : मराठा (Maratha) समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले (PI Kirankumar Bakale) यांच्या अटकेसाठी तपासपथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे (Thane City) शहरात मुक्कामी आहे. पोलिसांकडून (Police) त्यांचा कसून शोध घेतला जात असल्याचे सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी माहिती देताना सांगितले. (Police squad behind Suspended PI Kirankumar Bakale)

Kirankumar Bakale
Dr. Nilam Gorhe: अपहरणाच्या गुन्ह्यात राज्याचा क्रमांक दुसरा

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. बकाले यांचा जिल्‍हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर मराठा समाजाच्या वतीने अटकेची तीव्र मागणी होत आहे.

Kirankumar Bakale
आमदारांना दिवाळी गिफ्ट; ठाकरे सरकारच्या कामांवरील स्थगिती उठवली!

बकाले यांच्या शोधार्थ तपास पथक गेल्या तीन दिवसांपासून ठाणे येथे मुक्कामी असून मिळालेल्या प्रत्येक माहितीचा कसून तपास केला जात आहे. गुन्ह्यातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन याला सहआरोपी केल्यानंतर तोही बेपत्ता झाला आहे. दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आले असून संशयितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असे, सहाय्यक पोलिस अधीक्षक चिंता यांनी सांगितले.

नोटीस घेण्यास नकार

पोलिसदलातर्फे घडल्या प्रकाराची खातेअंतर्गत चौकशी सुरु असून हजर राहण्यासाठी अशोक महाजन यांना तीन वेळेस नोटीस देण्यात आली. मात्र, त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. तर, बकाले यांच्या जळगावातील घराला नोटीस चिटकविण्यात आली असून त्यांना नाशिक येथे हजेरीच्या सूचना दिल्या असून तिथेही ते हजर राहत नाही.

मुख्य पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न

दाखल गुन्ह्यात दोघांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप ज्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आली आणि तेथून ती व्हायरल झाल्यानंतर संबधीताचा मोबाईल हाच मुख्य पुरावा आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच अशोक महाजन याने मोबाईल हरवल्याची तक्रार दिली. बकालेंचा स्वतःचा पत्ता नसून त्याचाही मोबाईल बंदच आहे. तर, गुन्हेशाखेतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मोबाईलच बदलून टाकल्याची माहिती समोर येत आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com