मनसेच्या ॲक्शनला पोलिसांकडून हद्दपारीची रिॲक्शन!

नाशिकच्या २९ पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीचे न्यायालयाचे आदेश
MNS leader Sujata Dere With supporters
MNS leader Sujata Dere With supportersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांनी शहरात बुधवारी पहाटेपासून आंदोलनास सुरवात केली. पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास सुरवात करताच पोलिसांनी (Police) त्यांना ताब्यात घेत शांतता ठेवण्याचे कामे केले. यानंतर पोलिसांनी या सर्व पदाधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या २९ पदाधिकाऱ्यांना १५ दिवसासाठी शहरातून हद्दपार (Deportation) केले.

MNS leader Sujata Dere With supporters
आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर २७० पदाधिकारी यांना नोटिसा, ११९ जणांवर जमावबंदी अंतर्गत कारवाई, तर २७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मेनंतर मशिदीवरील भोंगे न उतरविल्यास मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. मनसेच्या या इशाऱ्यानंतर नाशिक शहर व जिल्हा पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी पहाटे तीनपासून शहर पोलिस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवला होता.

MNS leader Sujata Dere With supporters
फडणवीसांनी ओबीसी, मराठ्यात लावली भांडणे

पहाटे पाचनंतर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून भद्रकाली, सातपूर आणि इंदिरानगर भागात मशिदींसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पहाटेपासूनच धरपकड केली. पोलिसांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याविरुद्ध तिन्ही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करत त्यांना न्यायालयात हजर केले.

न्यायालयाने २९ पदाधिकाऱ्यांना १५ दिवसांसाठी शहरातून अटी व शर्ती घालत हद्दपार केले. यानंतर पोलिसांकडून २७० पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या, तर ११९ जणांवर जमावबंदी अंतर्गत कारवाई केली. २७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत शहरात शांतता ठेवली. अंकुश पवार (जिल्हाध्यक्ष), दिलीप दातीर (शहराध्यक्ष), सुजाता ढेरे (माजी नगरसेविका), कामिनी दोंदे, अक्षरा घोडके, अरुणा पाटील, निर्मला पवार, स्वागता उपासनी, अर्जुन वेताळ, ललित वाघ, देवचंद केदारे, नितीन माळी, मेघराज नवले, कैलास मोरे, बबलू ठाकरे, अजिंक्य शिर्के, तुषार जगताप, भूषण सूर्यवंशी, पंकज दातीर, प्रफुल्ल आपटे, राजेश परदेशी, विजय आगळे, सचिन भोसले, मनोज घोडके, सत्यम खंडाळे, अमित गांगुर्डे, संतोष कोरडे, निखिल सरपोतदार, संजय देवरे यांचा त्यात सनावेष आहे.

या आहेत अटी

न्यायालयाने १५ दिवसांसाठी शहरातून हद्दपार करत त्यांच्याकडून १५ दिवस कुठे राहणार यांची माहिती घेत या काळात कुठल्याही प्रकारच्या आंदोलनात सहभागी न होण्याचे बंधपत्र लिहून घेतले आहे. जर याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर पुन्हा कारवाई होणार आहे.

----

शहरात शांतता ठेवण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात आली आहे. जोपर्यंत पक्षाकडून आंदोलन थांबविले जाणार नाही तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

- जयंत नाईकनवरे, पोलिस आयुक्त

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com