काठीच्या राजवाडी होळीत राजकीय नेते, अधिकाऱ्यांनी धरला ठेका!

दोन वर्षांनंतर होळीसाठी राजकीय, सामाजिक नेत्यांसह अधिकाऱ्यांनीही धरला ठेका.
Padmakar Walvi & Seema Walvi in Holi celebration
Padmakar Walvi & Seema Walvi in Holi celebrationSarkarnama

नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये होळी सणाचा मोठा इतिहास व रूढी, परंपरा आहे. सांस्कृतिक ढोल नृत्य, रूढी-परंपरेच दर्शन घडवणारा होळी सण सात दिवस वेगवेगळ्या गावांमध्ये होळी (Kathi holi) पेटवून साजरा केला जातो. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या काठी येथील राजवाडी होळी शनिवारी हर्ष उल्हासात झाली. यावेळी राजकीय नेते, (Political leaders)अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकुटुंब हजेरी लावत ठेका धरला.

Padmakar Walvi & Seema Walvi in Holi celebration
मंजुळा गावितांनी मतदारसंघासाठी आणला ६१.७४ कोटींचा निधी!

यंदा या होळीसाठी माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. चंद्रशेखर पाटील, पोलिस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी कुटुंबासह हजेरी लावत राजवाडी होळीच्या जल्लोषात सहभागी होऊन आनंद लुटला.

Padmakar Walvi & Seema Walvi in Holi celebration
नवा व्हेरियंट येतोय... राजकीय मंडळी अलर्ट होतील का?

सातपुडा पर्वतरांगांमध्ये १३ मार्चपासून होळी महोत्सवाला सुरवात झाली आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या काठी येथील राजवाडी होळी १७ मार्च संध्याकाळपासून उत्सवाला सुरवात झाली. संपूर्ण रात्रभर आदिवासी बांधवांद्वारे परंपरेनुसार कमरेला घुंगरू डोक्यावर मोरपीस मोरखी, बाबाबुध्या धानका डोको, होळी सेवेकरी आदी वेशभूषा परिधान करून पारंपारिक ढोलाच्या तालावर विविध नृत्य करून होळी सणाची शोभा वाढविली. काठी येथील राजवाडी होळीमध्ये होणारे नृत्य व येथील होळी सण पाहण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यातून नागरिक येतात.

यंदा होळीनिमित्त काठी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे काठी येथील होळी उत्सवात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली. दरम्यान आदिवासी बांधवांबरोबर पारंपारिक नृत्य करून अधिकारी वर्गानेही राजवाडी होळीचा आनंद लुटला.

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या काठी येथील राजवाडी होळी आदिवासी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण करते. होळीनिमित्त भाविक दोन महिन्यांपासून नवस करून आपापल्या पद्धतीने पाळणी म्हणजेच विधीवत पूजा-अर्चा करून होळी मातेला साकडे घालतात. रात्रभर सांस्कृतिक नृत्य केल्यानंतर सकाळी सहाला जवळपास शंभर फूट उंच बांबूचा दांडा हातांनी खोदलेल्या खड्ड्यात रोवून चारही बाजूंनी पाला पाचोळा व लाकडे ठेवून होळी पेटविली.

दांडा पूर्व दिशेला

होळी पेटताना बांबूचा दांडा पूर्व दिशेला पडला तर पाऊस पाणी चांगलं पडून शेतीमध्ये चांगले उत्पन्न येते, अन्नधान्याची भरभराटी होते अशी धारणा आहे. यंदा होळीचा दांडा पूर्व दिशेला पडल्याने चांगले दिवस येतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आज मोलगी, काकडदा तसेच उद्या रोषमाळ, धनाचे धडगाव त्यानंतर अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यात होळीनिमित्त साजरी केली जाणारी दिंडण मातेची पूजाही २२ मार्चपर्यंत सुरू राहणार असून आदिवासी बांधव ह्या सांस्कृतिक पारंपारिक होळी सणाचा आनंद लुटणार आहेत.

--

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com