मंजुळा गावितांनी मतदारसंघासाठी आणला ६१.७४ कोटींचा निधी!

अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नांना यश
MLA Manjula Gavit
MLA Manjula GavitSarkarnama
Published on
Updated on

साक्री : तालुक्यातील बिगरआदिवासी आणि आदिवासी (Trible) क्षेत्रातील रस्ते सुधारणा करणे, लहान पुलांचे आणि स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे, जलनिस्सारणाची कामे करणे आदी कामांसाठी अर्थसंकल्पात ६१.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल असा दावा आमदार मंजुळा गावित (Manjula Gavit) यांनी दिली.

MLA Manjula Gavit
शंकरराव कोल्हे यांनी मराठी मातीतील माणसाचे कल्याण केले

राज्याच्या अर्थसंकल्पात साक्री तालुक्यातील रस्ते, पूल मोऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम उपविभाग साक्री आणि पिंपळनेर येथील उपअभियंत्यांसमवेत आमदार गावित यांनी बैठका घेऊन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

MLA Manjula Gavit
आतुर झालेल्या फडणवीसांना अडीच वर्षे थांबावे लागेल!

या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावातील आदिवासी क्षेत्रातील ५५ रस्त्यांच्या कामांसाठी २४.२४ कोटी रुपयांची तरतूद, तर बिगर आदिवासी क्षेत्रात पिंपळनेर परिसरात दहा आणि साक्री परिसरात पाच रस्त्यांच्या कामांसाठी ३७.०५ कोटी रुपयांची अशी एकूण ६१.७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यात प्रामुख्याने देशशिरवाडे दिघावे-बेहेड-म्हसदी-देऊर रस्त्यांची सुधारणा, राज्यमार्ग सात रस्ता, नंदुरबार, साक्री, मनमाड राज्यमार्ग, टिटाणे ते पेटले रस्ता या प्रमुख रस्त्यांसह प्रमुख तेवीस रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे. आदिवासी व बिगर आदिवासी भागातील रस्त्यांच्या कामाला चालना मिळेल.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com