Nashik News : अवैध व्यवसायांकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष घातक!

Political leaders turn a blind eye to illegal businesses is becoming a killer for the city-राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाकडून ४४ लाखांचा मद्यसाठा जप्त
illegal alcohol
illegal alcoholSarkarnama
Published on
Updated on

Illegal liqueur action : नाशिकसह परिसरातील जिल्हे गुजरातच्या सीमेवर आहेत. केंद्र शासीत दमण, सेल्वास भाग लगत असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध मद्याचा व्यवसाय होतो. त्याबाबत पोलिस अधूनमधून कारवाई करतात, मात्र लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने प्रशासन उदासीन असते. नंदूरबार जिल्ह्यात पोलिसांनी नंदूरबार अंमली पदार्थ मुक्त जिल्हा अशी मोहीम राबविली, तसे प्रयत्न नाशिकला केव्हा होणार अशी विचारणा होत आहे. (People representive should look in illegal businesses & liqueur)

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच कारवाई करीत ४४ लाखांचे दमणहून आणलेले मद्य जप्त केले. नाशिक, (Nashik) धुळे, (Dhule) नंदुरबारसह (Nandurbar) लगतच्या जिल्ह्यात हा अवैध व्यवसाय फोफावला आहे. त्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याची तक्रार आहे.

illegal alcohol
Sinnar News: मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यावर आमदार कोकाटे यांनीही मागणी केली!

नंदूरबार जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून जिल्हा मादक पदार्थ मुक्त करण्याचे अभियान पालकमंत्री विजयकुमार गावित यांच्या पुढाकाराने राबविले जात आहे. नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यात देखील त्याची गरज आहे. मात्र लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्याचे याबाबत मौन असल्याने हा व्यवसाय फोफावत चालल्याचे बोलले जाते.

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने अवैध मद्य वाहतुक करणाऱ्यास पकडून त्याच्या वाहनातून रूपये ४४ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक जयराम जाखेरे यांनी ही दिली आहे.

illegal alcohol
Uddhav Thackeray यांच्या टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर | BJP | Shivsena | Devendra Fadnavis

मद्यसाठा वाहतुक करणारे वाहन मुंबई -आग्रा रोडने द्वारका येथे थांबविण्याचा प्रयत्न भरारी पथकाने केला असता वाहनचालकाने वाहन अधिक वेगाने उड्डाणपुलावरून आडगावच्या दिशेने भरधाव वेगाने निघाले. भरारी पथकाने पाठलाग करून आडगाव शिवारात वाहन आडवून वाहनाची तपासणी करण्यात केली. यावेळी त्यात पॅम्पर मेडीसीनच्या प्लॅस्टिक गोण्या आढळल्या. गोण्यांच्या मागे दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी मान्यता असलेल्या परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या विदेशी मद्याचे अडीचशे बॉक्स व बिअरचे ८० बॉक्स असे ३३० बॉक्स आढळून आले.

illegal alcohol
Dhule Shivsena Politics : भ्रष्टाचारी `भाजप`ला उखडून फेकणारच!

याबाबत चालक शहबाज हुसेन अन्सारी (बिहार) यास अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com