Dhule Shivsena Politics : भ्रष्टाचारी `भाजप`ला उखडून फेकणारच!

Shivsena will thrown out BJP from the power in Dhule-महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व संस्थांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याने जनता त्रस्त आहे.
Prof. Sharad Patil
Prof. Sharad PatilSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : भारतीय जनता पक्ष महापालिका, जिल्हा परिषदेसह ज्या ज्या ठिकाणी सत्तेत आहे, तीथे त्यांनी प्रचंड गौरप्रकार व भ्रष्टाचार केला आहे. शिवसेना जनतेच्या हितासाठी त्याविरोधात अत्यंत आक्रमकपणे लढत आहे. आम्ही त्यांचे खरे स्वरूप जनतेपुढे उघड करू असे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. (Shivsena take launched a political campaign against BJP In dhule)

शिवसेनेने (Shivsena) काँग्रेस, (Congress) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांसह विविध पक्षांची मोट बांधली आहे. येत्या महिनाभरात भाजप (BJP) विरोधात प्रचंड मोठा मोर्चा काढला जाईल, अशी घोषणा प्रा. पाटील (Prof. Sharad Patil) यांनी केली.

Prof. Sharad Patil
Jalgaon News : आमदार चिमणराव पाटील यांना शिंदे सरकारचे २८ कोटींचे गिफ्ट!

प्रा. पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष महापालिकेत सत्तेत आहे. त्यांचे सर्व नेते, वरिष्ठ मंत्री सर्व फक्त सत्ता कशी मिळेल, निवडणूक कशी जिंकायची, अन्य राजकीय पक्ष कसे फोडायचे व लोकांची दिशाभूल कशी करायची यातच व्यस्त आहेत. त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेल्या नेत्यांना बरोबर ठेवले आहे. त्यामुळे जनता व संस्थांची लूट होत आहे. त्यावर हे मंत्री व नेते चकार शब्द बोलत नाहीत. त्यांचे हे स्वरूप जनतेपुढे आम्ही उघड केले आहे. आम्ही न थकता रोज आंदोलन करीत आहोत.

जिल्ह्यात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. एल. आर. राव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश पवार, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे यांसह विविध संघटना तसेच राजकीय पक्ष एकत्र आल्या आहेत. भाजपची सत्ता असलेल्या महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद तथा नगर परिषद अशा सर्व ठिकाणी एकत्र येऊन भाजपच्या भ्रष्टाचार व हुकूमशाहीविरोधात एकत्र काम करणार आहोत, असे प्रा. पाटील म्हणाले.

Prof. Sharad Patil
Dhule Politics : धुळ्यातही भाजपविरोधात ‘इंडिया’ गटाची आक्रमक एकजूट!

देशात व राज्यात `इंडिया` आघाडीची जमवाजमव सुरू असताना धुळे शहरात देखील उत्साह आहे. महाराष्ट्रात स्थानिक जिल्हा पातळीवर प्रथमच इंडिया गटाची बैठक झाल्याचा दावाही गटातर्फे करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com