भाजपच्या हिना गावित, राजेश पाडवीत राजकारण पेटले!

हीना गावित, राजेश पाडवींत जुंपल्याने पोलिसांनी आणले दंगा नियंत्रण पथक!
MLA Rajesh Padvi shows order
MLA Rajesh Padvi shows orderSarkarnama
Published on
Updated on

तळोदा : माझ्या मतदारसंघात (Taloja) मी विकासकामे मंजूर केली. त्याचे श्रेय दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी घेण्याचा प्रयत्न करू नये. यंत्रणांवर कितीही दबाव आणला तरी ते सहन करणार नाही, असा इशारा आमदार आमदार राजेश पाडवी (Rajesh Padvi) यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार डॅा हीना गावित (Dr. Heena Gavit) यांचे नाव न घेता दिला. त्यामुळे एका रस्त्याच्या कामावरून भाजपच्या (BJP) दोन गटांत जुंपली आहे. त्यात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

MLA Rajesh Padvi shows order
हीना गावित यांना भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे!

याबाबत भाजपचे आमदार राजेश पाडवी म्हणाले, संबंधित यंत्रणांनी प्रोटोकॉलप्रमाणे लोकप्रतिनिधींना बोलवावे, मात्र काही लोकप्रतिनिधी यंत्रणांवर दबाव आणून स्वतः विकासकामे आणल्याचा आव आणून भूमिपूजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

MLA Rajesh Padvi shows order
आमदार कोकाटेंना धक्का; आधी ग्रामपंचायत आता सोसायटीत पराभव!

त्यानंतर घडलेल्या घडामोडींत दुपारी दोनला आमदार राजेश पाडवी यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले. त्याच रस्त्यावर नंतर खासदार डॅा हीना गावित यांनीही भूमिपुजन केले. दुपारी येथे अजुन एक भूमिपूजन कार्यक्रम होणार असल्याने सोमावल परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

सोमावल ते नर्मदानगर या सहा किलोमीटर रस्ता विकासकामाचा भूमिपूजन कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आहे. त्यास कोणीही सन्मानपूर्वक येऊ शकते. मात्र मलाच त्यात बोलवले जात नसेल तर ते सहन केले जाणार नसल्याचेही आमदार पाडवी यांनी सांगितले. त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे माहिती देण्यात आली असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोमावल येथील कलावती फाउंडेशनच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्या वेळी आमदार पाडवी बोलत होते.

पत्रकार परिषदेत पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, माजी जिल्हा परिषद सभापती सतीश वळवी, माजी महिला जिल्हाध्यक्षा शानूबाई वळवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, भरत पवार, पंचायत समितीचे सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, विक्रम पाडवी, महेंद्र पवार, वीरसिंग पाडवी उपस्थित होते. या वेळी आमदार पाडवी यांनी सांगितले, की तळोदा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल नर्मदानगरपर्यंतचा एकूण सहा किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे. या रस्त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विनंती केली होती.

शहादा तालुक्यात चार कोटी ३९ लाख व तळोदा तालुक्यात पाच कोटी चार लाख रुपयांचा निधी २० एप्रिल २०२१ ला मंजूर करण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांच्याकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. जे कोणी या कामाचे श्रेय घेत असतील त्यांनी पाठपुराव्याचे दस्तावेज अथवा कागदपत्रे जाहीर करण्याचे आव्हान प्रेस नोटमधून देण्यात आले आहेत.

श्रेयवादातून प्रशासनाची कसरत

याच रस्त्याचे भूमिपूजन खासदार हीना गावित यांच्या हस्ते दुपारीच होणार असल्याचे सांगण्यात येत होते. यात रस्त्याच्या श्रेयवादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत, पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागूल व पोलिसपथक सोमावल परिसरात लक्ष ठेवून होते. तसेच दंगा नियंत्रण पथकदेखील तयार ठेवण्यात आले होते. त्यामुळे भूमिपूजन होईपर्यंत प्रशासनाची कसरत सुरू होती.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com