तळोदा : सातत्याने वाद आणि विविध राजकीय वादात चर्चेत राहणाऱ्या खासदार हीना गावित (Heena Gavit) यांना काल भाजपच्याच (BJP) कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. (Nandurbar) रस्त्याच्या कामाच्या श्रेयावरून भाजपच्या आमदार, खासदारांत जुंपली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चक्क आपल्याच पक्षाच्या खासदार हीना गावित यांना काळे झेंडे दाखवले. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच मनोरंजन झाले.
तळोदा येथील सोमावल ते नर्मदानगर रस्त्याचे अखेर खासदार हीना गावित यांनी भूमिपूजन केल्याने एकाच दिवसात एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन होण्याचा दुर्मिळ प्रसंग घडला आहे. त्यामुळे भाजपमधीलच आमदार व खासदार आमने-सामने आल्याचे बोलले जात आहे.
विकासकामांचे श्रेय वादातून हा प्रसंग घडल्याने तालुक्यात एकच चर्चा होत आहे, तर दुसरीकडे आमदार राजेश पाडवी यांच्या समर्थकांनी महामार्गावर एकत्रित येऊन काळे झेंडे घेऊन निदर्शने केली. याबाबत पक्षाच्याच केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या निधीतील रस्त्याचे एकाच दिवसात दोनदा भूमिपूजन झाल्याने पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.