महाजनांच्या विवाह सोहळ्याला इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन?

नाशिकच्या भाजपसह विविध पक्षांतील भावी नगरसेवकांची हजेरी.
Leaders in Girish Mahajan`s Daughter marrige
Leaders in Girish Mahajan`s Daughter marrigeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजपचे (BJP) नेते व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला नाशिकमधून सर्वपक्षीय नेत्यांनी लावलेली हजेरी चर्चेचा विषय ठरली. त्यातही भाजपच्या महापालिका (NMC) निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या इच्छुकांसह आमदारांनी केलेले शक्तीप्रदर्शनही चर्चेत आले आहे.

Leaders in Girish Mahajan`s Daughter marrige
खासदार गोडसेंचा चिमटा, देवयानी फरांदेंना ४ वर्षांनी जाग आली काय?

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या द्वितीय कन्येचा विवाहसोहळा जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे थाटात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी लावली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, कपिल पाटील, भारती पवार यांच्यासह काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम यांच्यासह हजारो लोक उपस्थित होते.

Leaders in Girish Mahajan`s Daughter marrige
केळीच्या प्रतिष्ठेसाठी ५० वर्षे लढणारा शंभरीतील योद्धा!

गिरीश महाजन यांनी सर्व विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्या मंडळींचे स्वागत केले. दरम्यान, नाशिकमधूनही मोठ्या प्रमाणात भाजपच्या इच्छुकांनी हजेरी लावली. एवढेच नव्हे तर महाजन यांच्या जामनेर येथील बंगल्यावरही हजेरी लावून केलेला चरणस्पर्श महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशा ठरविणारा दिसून आला. या वेळी माजी नगरसेवकांनी कुटुंबीयांसह विवाह सोहळ्याला हजेरी लावली. ज्या नगरसेवकांना शक्य झाले नाही, त्यांनी नातेवाइकांना पाठवून विवाहास शुभेच्छा दिल्या. राजकारणात नवीन आलेल्या व नगरसेवक होण्याची इच्छा असलेल्या नेत्यांनी फोटोसेशनाची हौस भागवून शर्यतीत असल्याचा संदेश दिला.

महाजनांचे महत्त्व अधोरेखित

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गिरीश महाजन यांचा नाशिकशी दुरावा वाढला होता. पक्षानेही प्रभारी पदाचा कार्यभार आमदार जयकुमार रावल यांच्याकडे सोपविला होता. परंतु, महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी नाशिकचा अनुभव असलेल्या महाजन यांच्याकडे सूत्रे सोपविल्यानंतर महाजन यांचे नाशिकच्या राजकारणातील स्थान पुन्हा अधोरेखित झाले.

नाशिकपासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरील जामनेर येथील विवाह सोहळ्याला नाशिकमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावत शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे महाजन यांच्याकडूनही सोहळ्याला उपस्थित असलेल्यांची विचारपूस करताना कोण आले नाही. याचीदेखील विचारणा झाल्याने विवाह सोहळ्याला उपस्थित नसलेल्यांकडून मोबाईलवरून शुभेच्छांचा सोपस्कार पार पाडण्यात आला.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com