नाशिक : आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) चार-पाच वर्षात एखादे काम करत असतील त्यामुळे सावरकरांच्या (Veer Sawarkar) अभिनव भारत संस्थेच्या कामासाठी मी केलेल्या योगदानाने अस्वस्थ झाल्या असाव्यात. त्यांनी २०१८ मध्ये पत्र दिले होते. त्यावर त्या चार वर्षांनी विधाने करत आहेत. त्यांना आत्ता जाग आली का?. त्यांनी कधी सावरकर जयंतीला त्यांच्या जन्मस्थळी पाय तरी ठेवला आहे का? असा चिमटा खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse) यांनी घेतला आहे. (Hemant Godse's statement on Devyani Pharande News)
खासदार गोडसे यांनी नाशिक शहरातील सावरकरांच्या वास्तूसाठी पाच कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यावर आमदार फरांदे यांनी गोडसे यांनी इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये अशी टिका केली होती. यासंदर्भात खासदार गोडसे बोलत होते.
ते म्हणाले, अर्थसंकल्पात विकासकामाच्या निधीच्या तरतुदीसाठी जे पत्र दिले जाते त्याबाबत अर्थसंकल्पात त्याचा समावेष झाल्यास ती तरतुद त्या आर्थिक वर्षासाठीच मर्यादीत असते. त्या कालावधीत त्याची प्रशासकीय मान्यता, मंजुरी आदी प्रशासकीय पुर्तता करून काम सुरु झाले नाही तर ती तरतुद निरस्त होते. याविषयी फरांदे यांना माहिती नसावी, त्या माहिती अभावी त्यांनी असे विधान केले असावे.
आमदार फरांदे स्वतः म्हणतात मी २०१८ मध्ये पत्र दिले होते. त्यावेळी त्यांची तरतुद एक कोटी होती. मी सांगितलेला निधी पाच कोटींचा आहे. एक कोटी आणि पाच कोटी यातील फरक त्यांना कळत नाही का. याचा अर्थ एव्हढाच की त्यांना त्या कामाबाबत त्यांना चार वर्षानंतर आज जाग आली का?. कदाचीत आमदार फरांदे चार पाच वर्षात एखादे काम करत असतील, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली असेल. मी रोज मतदारसंघासाठी सक्रीय असतो. प्रत्येक आठवड्यात माझ्याकडे जनतेच्या विकासासाचा, विकासकामांचा नवा विषय असतो.
खासदार गोडसे म्हणाले, मी देखील लोकप्रतिनिधी आहे. हे काय बोलत आहेत. सर्वात आधी भगूरच्या सावरकर जन्मस्थळ असलेला वाडा व त्याच्या विकासाचे काम मी खासदार होतीच ६८ लाखांचा निधी मिळवून केले होते. तीस टक्के काम जे रेंगाळले होते, ते मी पूर्ण करून घेतले. आमदार फरांदे या केवळ सावरकरांच्या गप्पा मारतात, मात्र या कधी सावरकरांच्या जयंतीला भगूरच्या सावरकर स्मारकात अभिवादन करायला गेल्या आहे का?. मी दरवर्षी सकाळी ७ वाजता तीथे असतो. टिका सोडा व काम करायचे असेल तर अनेक विषय आहेत. मी सुचवतो, ती कामे करा. मागच्या वेळी तुमची सत्ता असताना तुम्हाला काहीच काम करता आलेले नाही, असा चिमटाही खासदार गोडसे यांनी घेतला.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.