Prakash Ambedkar Politics: भाजपची 'बी टीम' म्हटल्याने आंबेडकर चपापले

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक नेत्यांना बरोबर घेण्याचे नियोजन केले आहे. यावेळी ॲड आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनाही साद घातली
Adv Prakash Ambedkar, J. P. Gavit & Chhagan Bhujbal
Adv Prakash Ambedkar, J. P. Gavit & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News: वंचित बहुजन आघाडीने आता राज्यातील आदिवासींना आपल्याकडे वळवण्याचा डाव टाकला आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर हे जमेल त्यांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सीपीएमचे नेते जे. पी. गावित, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना साद घातली. वंचित बहुजन आघाडी भाजपची 'बी टीम' आहे का, या एका नेत्याच्या प्रश्नावर चपापलेल्या आंबेडकरांनी तातडीने स्पष्टीकरण दिले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी जमेल त्याला आपल्या सोबत येण्याचे आवाहन केले. त्यामुळे हा दौरा चर्चेचा विषय आहे.

ॲड प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विविध आदिवासी संघटनांना निमंत्रित केले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आदिवासी समाज घटकांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जमेल त्या प्रत्येकाला ते वंचित सोबत येण्याचे सांगत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या या मेळाव्याला विदर्भातील काही आदिवासी संघटना वगळता कोणतीही प्रमुख आणि मूळ प्रवाहातील संघटना सहभागी नव्हती. याउलट त्यांच्या या प्रयोगावर काही आदिवासी नेत्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला.

Adv Prakash Ambedkar, J. P. Gavit & Chhagan Bhujbal
Tribal Politics: संततधार पावसातही आदिवासींच्या भाजपविरोधातील आंदोलनाला 'धार'

वंचित बहुजन आघाडीच्या या मेळाव्याला विदर्भातील काही आदिवासी संघटना वगळता कोणतीही प्रमुख आणि मूळ प्रवाहातील संघटना सहभागी नव्हती. याउलट त्यांच्या या प्रयोगावर काही आदिवासी नेत्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला.

जळगाव येथील एका नेत्याने, "आपल्यावर भाजपची 'बी' टीम" असा आरोप होतो. त्याचे काय, असा थेट सवाल केला. या प्रश्नाने आंबेडकरांचा नक्कीच गोंधळ उडाला असावा. यावेळी ॲड आंबेडकर यांनी, मला वंचित बहुजन आघाडीचे स्वतंत्र अस्तित्व जपायचे आहे. त्यामुळे मी वेगळे व स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली, असे स्पष्टीकरण दिले.

नाशिक हे आदिवासी विचार प्रवाह आणि संघटनांचे प्रमुख केंद्र आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय देखील नाशिकलाच आहे. जिल्ह्याच्या व विभागाच्या अनेक भागात आदिवासी लोकप्रतिनिधी प्रभावीपणे काम करीत आहेत.

Adv Prakash Ambedkar, J. P. Gavit & Chhagan Bhujbal
Prakash Ambedkar : 'लाडकी बहीण' योजनेसाठी आदिवासींचे बजेट वापरले? प्रकाश आंबेडकरांचा गंभीर सवाल

ॲड आंबेडकर यांनी या बैठकीचे ठिकाण विचारपूर्वकच नाशिक हे निवडले असावे. येथे बैठक घेतल्याने त्याला वेगळे महत्त्व होते. सध्या नाशिक येथे आदिवासींच्या पेसा कायद्यान्वये उमेदवारांच्या भरतीच्या प्रश्नावर मोठे आंदोलन सुरू आहे.

यावेळी राज्य आदिवासी विकास संघटनेचे अध्यक्ष अशोक बागुल यांनी देखील आंबेडकर यांना थेट प्रश्न विचारला. आपली संघटना प्रामुख्याने आंबेडकरी चळवळीशी संबंधित आहे. आदिवासी संदर्भात कोणतेही काम वंचित बहुजन आघाडीने केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे आजवर आदिवासींची मते तुम्हाला मिळालेली नाहीत. आम्ही तुम्हाला कसे सहकार्य करणार?. ही श्री बागुल यांची भूमिका होती.

एकंदर लोकसभा निवडणुकीत महिनाभर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चर्चेत गुंतवून ठेवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला विधानसभेला सामोरे जायचे आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आयात केलेले अनेक उमेदवार स्वगृही परतले आहेत.

त्यामुळे लोकसभेचा अनुभव गाठीशी असताना ऐनवेळी सुरू केलेली आदिवासी आणि ओबीसी संघटना आणि मतदारांना आकर्षित करण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

यावेळी ॲड आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनाही साद घातली. श्री. गावित यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर यावे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाचे जोडलेली नाळ तोडावी, असे ते म्हणाले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नावाजलेले ओबीसी नेते आहेत. त्यांनाही आंबेडकर यांनी आपल्याबरोबर यावे, असे आवाहन केले.

एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री आंबेडकर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमेल त्याला आपल्याबरोबर घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांचे हे प्रयत्न विधानसभेला अल्प वेळ असल्याने यशस्वी होतील का? त्याचबरोबर लोकसभेचा अनुभव गाठीशी असल्याने महाविकास आघाडीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडतील का? असे अनेक प्रश्न ॲड आंबेडकर यांच्या नाशिक दौऱ्यातून पुढे आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com