Champat Rai: 'राम मंदिर सोहळ्याला अडवाणी अन् मुरली मनोहर जोशींनी येऊ नये'; चंपत राय असं का म्हणाले ?

Ram Mandir Inauguration: अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात अजून 22 जानेवारीला मोठा अभिषेक सोहळा पार पडणार आहे.
Murli Manohar Joshi, Lal Krishna Advani, Champat Rai
Murli Manohar Joshi, Lal Krishna Advani, Champat RaiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: अयोध्येत भगवान श्री रामाचे भव्य मंदिर बांधले जात अजून 22 जानेवारीला मोठा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्याची मोठी तयारी सुरु आहे. मात्र, या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी येऊ नये, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

चंपत राय यांनी व्यक्त केलेली ही भूमिका नेमकं कोणाच्या इशार्‍यावर होती, असा सवाल आता अनेकजण उपस्थित करत आहेत. चंपत राय यांनी दोघांच्या वयाचे कारण देत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा आग्रह केला आहे. तर मुरली मनोहर जोशी यांनी त्यांच्या गुडघ्यांवर ऑपरेशन झाल्यानंतर देखील ते येणार असल्याचा अट्टाहास केल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murli Manohar Joshi, Lal Krishna Advani, Champat Rai
Champat Rai : 'मोदी हे भगवान विष्णूचे अवतार'; श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचं वक्तव्य

25 सप्टेंबर 1990 मध्ये सोमनाथ येथून राम मंदिर रथयात्रा तत्कालिन भाजपचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात निघाली होती. यात्रेने सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास देशभरात केला होता. या रथयात्रेत अडवाणी सहा सभांना संबोधित करत असत. या यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांचा पाठिंबा व सहभाग होता.

"बच्चा बच्चा राम का.. जन्म भूमी के काम का.." अशा घोषणा देत ही रथ यात्रा निघाली होती. 30 ऑक्टोबर 1990 ला ही रथ यात्रा अयोध्येला पोहचणार होती. पण, त्या पुर्वीच 23 ऑक्टोबरला बिहारमध्ये अडवाणी यांना अटक करण्यात आली होती. मंदिर वही बनायेंगे.. या नार्‍यांनी ही रथयात्रा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी रथयात्रा काढून देशातील वातावरण ढवळून काढणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांनी या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहू नये, असे आवाहन राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी केले आहे.

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे स्वास्थ्य आणि वयोमानामुळे मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत. या दोन्ही नेत्यांचे वय लक्षात घेऊन त्यांना या सोहळ्यास न येण्याची विनंती करण्यात आली होती आणि अडवाणी यांनी ही विनंती मान्य केली, असे चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

"अडवाणी यांनी तर या सोहळ्यास उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु त्यांचे वय लक्षात घेता आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी कृपया येऊ नये, तसेच मी स्वतः डॉ.मुरली मनोहर जोशी यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना फोन करून या कार्यक्रमास येऊ नका,असे सांगत राहिलो, पण ते कार्यक्रमाला येण्यावर ठाम राहिले. तुमचे वय आणि येथील थंडी लक्षात घेऊन मी तुम्हाला विनंती करत आहे. तुमच्या गुडघ्यांवर अलीकडेच शस्त्रक्रिया झाली, असं त्यांना सांगितलं तरी ते म्हणाले, मी येणारच. शेवटी परमेश्वराची इच्छा", असेही चंपत राय म्हणाले.

मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल, सर्व विश्वस्त यांच्यासह इतरही अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 23 जानेवारीपासून जनतेला रामलल्लाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

(Edited by- Ganesh Thombare)

Murli Manohar Joshi, Lal Krishna Advani, Champat Rai
Vinod Tawde: तावडेंनी राष्ट्रीय राजकारणात कसं कमबॅक केलं ? मोदी, शाह, नड्डांनंतर पक्षात प्रमुख स्थान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com