Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांच्या सभेला नगर जिल्ह्यात अडथळे ? पोलिसांची अद्याप परवानगी नाही

Ahmednagar Politics : मोर्चाला अद्यापही पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही.
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar NewsSarkarnama

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील राहुरी येथे येत्या एक सप्टेंबर रोजी अल्पसंख्यांक जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मोर्चाला अद्यापही पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. हा मोर्चा किंवा सभा होऊ नये यासाठी काही लोकप्रतिनिधी यांनी पोलीस प्रशासनावर दबाव टाकल्याची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा मोर्चा वा सभा होणार का नाही याबद्दल सांशकता निर्माण झाली आहे. याबाबत बहुजन वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नगर ऊत्तर जिल्हाध्यक्ष अनिल जाधव यांनी कोणत्याही परिस्थितीत सभा होणार असल्याचे सांगितले.

नगर जिल्ह्यात कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, नगर आदी ठिकाणी घडलेल्या प्रकारामुळे जिल्ह्यातील सामाजिक वातावरण बिघडल्याचे बोलले जात आहे. विविध ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्च्याच्या आयोजनानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाची सभा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Prakash Ambedkar News
Amarsinh Pandit Emotional Post : पवारांच्या टीकेनंतर अमरसिंह पंडितांची भावनिक पोस्ट; ‘श्रद्धेय साहेब, मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही’

मोर्चाच्या परवानगीसाठी जिल्हा पोलीस (Police) प्रशासनाला अर्ज दिला आहे. अद्याप यासाठी पोलिसांची परवानगी मिळाली नसल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, सभेसाठी आयोजन सुरू असल्याचे समजते. राहुरी तालुक्यातील उंबरे या ठिकाणी विद्यार्थिनीवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकरण राज्यात गाजले. यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विविध हिंदू संघटनांनी राहुरी येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करत या प्रश्नाला वाचा फोडली होती.

Prakash Ambedkar News
Kolhapur NCP News : शरद पवारांची खेळी; 'मविआ'कडून शाहू महाराज छत्रपती रिंगणात उतरणार..?

आता प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्यांक समाजाच्या आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासन परवानगी देणार का किंवा याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एक सप्टेंबरला राहुरीमध्ये जन आक्रोश मोर्चा आणि जाहीर सभाही होणार असल्याचे वंचित आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com