Prasad Hire BJP Join : ...अन् प्रसाद हिरेंनी सांगितलं काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण!

Prasad Hire’s Statement on Joining BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
Prasad Hire addressing the media after officially joining BJP, explaining his reasons for leaving Congress
Prasad Hire addressing the media after officially joining BJP, explaining his reasons for leaving Congresssarkarnama
Published on
Updated on

Why Did Prasad Hire Leave Congress?: मालेगाव येथील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांनी आज(मंगळवार) भाजप पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्यासोबत पाचशेहून अधिक समर्थकांनी भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्ष कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी बावनकुळे यांनी , प्रसाद हिरे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय योग्य घेतला आहे. पक्ष त्यांना नक्कीच चांगली संधी देईल. मालेगाव परिसरात भाजपला या प्रवेशामुळे अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Prasad Hire addressing the media after officially joining BJP, explaining his reasons for leaving Congress
National Herald Case : मोठी बातमी! सोनिया गांधी, राहुल गांधींच्या अडचणी वाढल्या; 'ED' कडून आरोपपत्र दाखल!

काँग्रेसचे माजीमंत्री बळीराम हिरे यांचे पुत्र असलेले प्रसाद हिरे यांनी जिल्ह्यातील विविध सहकारी आणि शैक्षणिक संस्थांवर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी भाजप तर्फे विधानसभेची उमेदवारी केली होती. मालेगाव बाह्य अर्थात दाभाडी मतदार संघात त्यांचा चांगला प्रभाव असल्याचा दावा केला जातो. त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला तो मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपला मालेगाव बाह्य मतदारसंघात अधिक विस्तार करण्यास प्रसाद हिरे यांचा प्रवेश उपयुक्त ठरेल असे दिसते. सध्या या मतदारसंघात शालेय शिक्षण मंत्री आणि महायुतीचे घटक दादा भुसे हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य वाढणार आहे. काँग्रेसला पक्ष विस्तार आणि अस्तित्वासाठी हे मोठे आव्हान आहे.

Prasad Hire addressing the media after officially joining BJP, explaining his reasons for leaving Congress
Hasan Mushrif Crisis : हसन मुश्रीफांसमोर 'दुहेरी' संकट, मात्र आतापासून...!

तर, मालेगाव परिसर तसेच जिल्ह्यातील विविध विकास कामांना चालना मिळावी म्हणून आपण भाजप पक्षात प्रवेश केला आहे. उद्याच्या स्थितीत भाजप हा जनतेशी कनेक्ट असलेला पक्ष आहे. केंद्रात आणि राज्यात पक्षाला जनतेने सत्तेचा जनादेश दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे असेही हिरे यावेळी म्हणाले.

मालेगाव शहर आणि जिल्हा हा एकेकाळी काँग्रेस विचारांचा प्रभाव असलेला परिसर होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शहरातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाले होते. मात्र ग्रामीण भागातून भाजपला मोठी आघाडी होती. या मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा प्रभाव वाढत असल्याचे चिन्ह होते. आता हिरे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला पक्ष विस्तारासाठी मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com