
ED files chargesheet : अंमलबजावणी संचालनालयाने(ED) नॅशनल हेराल्ड प्रकरणात आता आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे आता यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने उचलेल्या या पावलामुळे याप्रकरणातील आरोपींसभोवतालीचा फास अधिकच घट्ट झाला आहे.
ईडीने आज नॅशनल हेराल्ड मनी लॉड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ओव्हरसीज यूनिटचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्याविरोधात दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालायने आरोपपत्रात सुमन दुबे आणि अन्य लोकांच्या नावांचा देखील समावेश केला आहे. आरोपपत्राची दखल घेण्याबाबतची सुनावणी २५ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे.
याआधी अंमलबजावणी संचलनालय(ED)ने शनिवारी काँग्रेस नियंत्रित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड(AJL)शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीची भाग म्हणून जप्त केलेल्या तब्बल ६६१ कोटींची स्थावर मालमत्तेच्या ताब्यासाठी नोटीस बजावली होती. यंत्रणेने एका निवेदनात सांगितले आहे की, त्यांनी संबंधित कागदपत्रे सक्षम मालमत्ता निबंधकांकडे सादर केली आहेत, जिथे या मालमत्ता आहेत.
याचबरोबर ही नोटीस या मालमत्तांच्या प्रमुख भागांवर शुक्रवारी चिकटवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये दिल्लीतील आयटीओ(५अ, बहादूर शाह जफर मार्ग) येथील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे(पूर्व) परिसरातील मालमत्ता(प्लॉट क्रमांक २, सर्व्हे क्रमांक ३४१) आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमधील बिशेश्वर नाथ मार्ग(मालमत्ता क्रमांक -१) येथील एजेएल बिल्डिंग यांचा समावेश आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.